शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंदांच्या शाळेत आरोग्याची हेळसांड; समितीचा अहवाल, संस्थेतील मुलीवर झाला होता बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:08 IST

शिरुर तालुक्यातील पाबळमधील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत मुला-मुलींच्या आरोग्याची काळजीच घेतली जात नव्हती. तसेच, मुलींच्या मासिक पाळीबाबतच्या नोंदी देखील घेतल्याचा जात नसल्याचा अहवाल अपंग कल्याण आयुक्तालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे.

पुणे : शिरुर तालुक्यातील पाबळमधील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत मुला-मुलींच्या आरोग्याची काळजीच घेतली जात नव्हती. तसेच, मुलींच्या मासिक पाळीबाबतच्या नोंदी देखील घेतल्याचा जात नसल्याचा अहवाल अपंग कल्याण आयुक्तालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे. तसेच संस्थेने बलात्काराचा आरोप असलेल्या कर्मचाºयाच्या निलंबनाचा आदेश पाळला नसल्याचे गंभीर निरीक्षणही त्यात नोंदविण्यात आले आहे.मुंढव्यातील भटक्या, विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने पाबळ येथील मतीमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. या शाळेतील एका अल्पवयीन मतीमंद मुलीवर शाळेतीलच काळजीवाहक कर्मचाºयाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर २०१७रोजी रामदास ज्ञानोबा लष्कर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो अटकेत आहे. यातील अन्य आरोपी मनिषा जाधव या जामीनावर आहेत. या घटनेनंतर अपंग कल्याण आयुक्तालयाने संबंधित शाळेची तपासणी करण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली होती. त्यात गणेश निकाळजे, सुजीत लोखंडे, पंकज वाघमारे आणि राजीव मोरे यांचा समावेश होता.शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी, त्याचे चित्रण साठविण्याची (बॅकअप) सुविधा देण्यात आलेली नाही.अधिकारी फिरकलेच नाहीतपाबळ येथील मतीमंद निवासी शाळेत समाज कल्याण अधिकाºयाने १४ सप्टेंबर २०१२ ते २६ डिसेंबर २०१७ या कालावधीत संबंधित शाळेस भेटच दिली नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. जबाबदार अधिकारी जर शाळेस भेटच देत नसेल तर संबंधित शाळेला अनुदान कसे मंजुर झाले, याची चौकशी करण्याची मागणी प्राहर अपंग क्रांती आंदोलनाच्या सुरेखा ढवळे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांची तपासणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.शाळेतील मुलींच्या मासिक पाळीच्या नोंदी नियमित ठेवल्या जात नाहीत. तसेच, आरोग्य तपासणीत देखील अनियमितता असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले आहेत.तपासणीवेळी शाळेत ३३ मुले हजर होती. त्यात ३१ मुले आणि २ मुली होत्या. या घटनेनंतर पालकांनी १० मुलींना घरी नेल्याची नोंद देखील अहवालात करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे