शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तेजस्विनी बसमध्ये दुपारी पुरुषांनाही ‘एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 03:01 IST

उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाचा निर्णय : धावतात रिकाम्या बस

पुणे : महिला प्रवाशांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमधून आता दुपारच्या वेळी पुरुष प्रवाशांनाही प्रवास करता येत आहे. या वेळेत बस रिकाम्या जात असल्याने उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘तेजस्विनी’ बससेवेची अवस्था यापूर्वीच्या महिला विशेष बससारखीच होणार की काय, असा प्रश्न महिला प्रवासी उपस्थित करत आहेत.

मागील वर्षी जागतिक महिला दिनी म्हणजे दि. ८ मार्चपासून खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात आली. सध्या या तेजस्विनीच्या सुमारे ४० बस मार्फत ४५० हून अधिक फेऱ्या होत आहेत. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात प्रतिमहिना सरासरी २ लाख ३३ हजार महिलांना तेजस्विनी बसमधून प्रवास केला आहे. तर प्रतिमहिना सुमारे ३४ लाख ३७ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. प्रतिकिलोमीटर सुमारे ३३ रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनानेच दिली आहे; मात्र त्यानंतरही ही सेवा तोट्यात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत तेजस्विनी बसला महिला प्रवाशांची गर्दी असते. प्रामुख्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरीला जाणाऱ्या महिला या सेवेला अधिक प्राधान्य देत आहेत; पण दुपारी १२ ते ५ या वेळेत तुलनेने खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. इतर बसलाही या वेळेत गर्दी कमी असते. त्या तुलनेत बहुतेक तेजस्विनी बस रिकाम्या धावत असल्याचे चित्र होते. त्यामुळे सरासरी उत्पन्नावर परिणाम होत होता. त्यामुळे दुपारी गर्दी कमी असल्याने पुरुष प्रवाशांना या बसमधून प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतच्या सूचना चालक व वाहकांना दिल्या असून, त्यानुसार पुरुष प्रवासीही दुपारी या बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान, बसमध्ये गर्दी नसल्यास कोणत्याही वेळेत पुरुष प्रवाशांना बसमध्ये घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याचे वाहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणत्याही वेळेत बसमध्ये पुरुष प्रवासी दिसत असल्यानेमहिला प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.तेजस्विनी बसला सकाळी व सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र दुपारच्या सत्रात या बस रिकाम्या धावत असल्याचे चित्र होते. त्यामुळे तोटा होऊ नये, या उद्देशाने दुपारच्या वेळी या बसमधून पुरुष प्रवाशांनाही प्रवास करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त अन्य वेळेतही पुरुष प्रवासी प्रवास करत असतील, तर त्याबाबत सूचना दिल्या जातील.- अजय चारठणकर,सहव्यवस्थापकीय संचालक 

टॅग्स :Puneपुणे