शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांबरोबर बैैठक घेणार - संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:30 IST

गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.

भोर - गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास संस्थेच्या वतीने नीरा-देवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांचे पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भेट देऊन आमदार थोपटे यांनी पाठिंबा दिला, त्या वेळी ते बोलत होते.या वेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे, जि.प सदस्य विठ्ठल आवाळे, कॉ. ज्ञानोबा घोणे, हनुमंत शिरवले, प्रकाश साळेकर, ज्ञानोबा दिघे, मारुती कंक, अंकुश कंक, नामदेव पोळ व धरणग्रस्त सहभागी झाले होते. यापूर्वी आंदोलकांना जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, कुलदीप कोंडे, विठ्ठल करंजे, मानसिंग धुमाळ, केदार देशपांडे, सुधीर कोठावळे, कृष्णाजी शिनगारे यांनी पाठिंबा दिला आहे. या वेळी थोपटे यांनी यापुढील काळात धरणग्रस्त संघटनांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन केले.दरम्यान, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे यांनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेला लेखी पत्र दिल. मात्र, संघटनेला ते मान्य नसून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी सांगितले.८५० खातेदारांचे पुनर्वसन अद्याप बाकीनीरा-देवघर धरणात सुमारे ४ हजार एकर जमीन पाण्यात गेली आहे. शेतकºयांची धरणात गेलेल्या खातेदारांची संकलन यादी १,४५० खातेदारांची असून, आतापर्यंत १५ वर्षांत फक्त ६०० खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले. ८५० खातेदारांचे (६० टक्के) पुनर्वसन अद्याप बाकी आहे. यामुळे धरणग्रस्तांची परवड सुरू आहे.धरणग्रस्त संघटनेतील वाद मिटवावानीरा-देवघर धरणग्रस्त संघटनेत दोन गट पडले असून त्याचा गैरफायदा सरकारी अधिकारी धरणग्रस्तांच्या प्रस्तावात त्रटी काढून घेत आहेत. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून एकत्रित काम करा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील सरकारी अधिकाºयांमुळे अनेक वर्षे पुनर्वसन रखडले असून, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या