शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय साह्य योजना : खासगी रुग्णालयात कोट्यवधी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:08 IST

नगरसेवक, कर्मचाऱ्यांना ९० टक्के परतावा

राजू इनामदारपुणे : महापालिकेच्या आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्याकडे दुर्लक्ष करणारे पदाधिकारी व प्रशासन यांनी स्वत:साठीच्या योजनांकडे मात्र पूर्ण लक्ष देऊन त्या व्यवस्थित करून घेतल्या आहेत. खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून ही सेवा घेण्यात येते व त्यासाठी त्यांना दर वर्षी कोट्यवधी रुपये अदा केले जात आहेत.

नगरसेवक तसेच माजी नगरसेवकांना अंशदायी वैद्यकीय साह्य अशा नावाची योजना आहे. योजनेत अंशदायी असा शब्द असला तरी साह्य मात्र ९० टक्के केले जाते. या योजनेला बिलाचे बंधन नाही, उत्पन्नाचे तर नाहीच नाही. आजार कोणता असावा, किती दिवस दाखल असावे, कोणत्या दर्जाच्या रुग्णालयात असावे, दाखल झाल्यानंतर किती वेळात महापालिकेला कळवावे, अशी कसलीच अट या योजनेत नाही. फक्त आजी किंवा माजी नगरसेवक असले तरी पुरेसे आहे.

घरी गेल्यानंतर औषधेही महापालिकेकडूनच विनामूल्य दिली जातात. त्यासाठीही दर वर्षी महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असते. या औषधांनाही ती महागडी किंवा स्वस्त असे काहीही बंधन नाही. महिनाभराची घ्यावीत की दोन-तीन दिवसांची घ्यावीत, याचेही काही बंधन नाही. औषधांची खरेदी निविदा जाहीर करून होत असली, तरीही त्यात बरेच घोळ आहेत. सजग नागरिक मंचाने यावर मध्यंतरी खुल्या बाजारातील किमती व महापालिकेच्या निविदेत नमूद करण्यात आलेल्या किमती, यांचा तुलनात्मक तक्ता जाहीर करून त्यातील पितळ उघडे पाडले होते. महापालिका कर्मचाºयांसाठीही हीच योजना अशीच आहे. अंशदायी वैद्यकीय साह्य असेच तिचे नाव आहे.

एकच अट या योजनेत आहे ती म्हणजे कोणी कोणत्या वर्गात दाखल व्हायचे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तर त्याने जनरल वॉर्डमध्येच दाखल व्हायचे. सेमी प्रायव्हेटमध्ये दाखल झाला तर योजनेसाठी अपात्र ठरतो. वर्ग २ च्या अधिकाºयांनी सेमी प्रायव्हेटमध्ये दाखल व्हायचे, ते प्रायव्हेटमध्ये गेले तर योजनेसाठी अपात्र समजले जातात. प्रायव्हेटमध्ये कोणी, व्हीआयपीमध्ये कोणी दाखल व्हायचे, हेही निश्चित केलेले आहे. ठरलेल्या विभागात दाखल होऊन उपचार केले, तरच त्यांना या योजनेत साह्य केले जाते. अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेसाठी महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक ३५ ते ४० कोटी रुपयांचे आहे. याचा लाभ गरजूंनाच होत आहे का, हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा आरोग्य विभागाकडे नाही.

सर्वसामान्य गरजूंना कमी लाभसर्वसामान्य नागरिकांसाठी शहरी गरीब योजना राबवली जात आहे. अशी योजना राबवणारी पुणे महापालिका ही पहिलीच महापालिका असल्याचे सांगितले जाते. १ लाख रुपये उत्पन्न, महापालिका हद्दीतील रहिवासी अशा दोनच अटी त्यासाठी आहेत. असाध्य म्हणजे कर्करोग, किडनी विकार अशा आजारांसाठी २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. समजा ५० हजार रुपयांचे बिल झाले असेल, तर महापालिका २५ हजार रुपयांचे बिल थेट रुग्णालयात जमा करत असते. त्या रुग्णाला त्याच वर्षात परत वेगळ्या किंवा त्याच उपचारांची गरज पडली, तर उर्वरित ७५ हजार रुपयांसाठी पुन्हा दावा करता येतो. याही योजनेसाठी महापालिका दर वर्षी २० ते २५ कोटी रुपयांचा खर्च करत असते. गरजूंना कमी व गरज नसलेल्यांना जास्त अशा या योजना गेली अनेक वर्षे आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत.रुग्णालयांवर नियंत्रण हवेजी रुग्णालये महापालिकेकडून पैसे घेतात, त्यांच्यावर महापालिकेचे कसलेही नियंत्रण नाही. नको त्या अटी लादून ते रुग्णांना त्रास देतात. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. महापालिकेचे रुग्ण योजनेतील सहभागासाठी पात्र असल्याचे पत्र विशिष्ट दिवसांतच दिले पाहिजे, असा आग्रह धरण्याचा रुग्णालयांना काहीही अधिकार नाही.- राजाभाऊ लायगुडे, नगरसेवकखर्च विनातपासणीच!

योजना चांगल्या आहेत; मात्र त्यांची छाननी करण्याची कोणताही यंत्रणा महापालिकेकडे नाही. रुग्णालयांनी कोणते उपचार केले, त्याची गरज होती का, त्याचा दर काय, असे काहीही यात पाहिले जात नाही. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च विनातपासणीच होत आहे.- किशोर धनकवडे, नगरसेवक

टॅग्स :Puneपुणे