शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune | वेताळ टेकडीवरुन मेधा कुलकर्णी-चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपणार

By श्रीकिशन काळे | Updated: April 5, 2023 17:00 IST

चंद्रकांत पाटील यांनी निविदा काढण्याचा आदेश दिला आहे, तर मेधा कुलकर्णी यांनी मात्र हा रस्ता होऊ नये, असा पवित्रा घेतला...

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावा लागला, पण आता त्यांच्याविरोधात वचपा काढण्याची नामी संधी माजी आमदार व भाजप नेत्या यांना वेताळ टेकडी मुळे आली आहे. वेताळ टेकडीवरून प्रस्तावित रस्त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी निविदा काढण्याचा आदेश दिला आहे, तर मेधा कुलकर्णी यांनी मात्र हा रस्ता होऊ नये, असा पवित्रा घेतला आहे. 

वेताळ टेकडीवरून बालभारती-पौड रस्ता  प्रस्तावित आहे. त्याला पुणेकर व टेकडीप्रेमींचा जोरदार विरोध आहे. या रस्त्यामुळे टेकडीचे नुकसान होणार आहे. त्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समिती काम करत आहे. त्यांनी नुकतीच मेधा कुलकर्णी आणि पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यात रस्त्याला मेधा कुलकर्णी यांनी जोरदार विरोध केला आहे. दरम्यान दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र या रस्त्याची निविदा लवकर काढा असे म्हणत आहेत. त्यामुळे भाजपमधील दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नागरिकांचा मेधा कुलकर्णी यांना मोठा पाठिंबा आहे. टेकडी वाचविण्यासाठी सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील यांना सामोरे जावे लागणार आहे.

पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत विक्रमकुमार म्हणाले होते की, टेकडीला खूप नुकसान होऊ नये म्हणून उड्डाणपूल करत आहोत. त्यावर मेधाताई म्हणाल्या होत्या की, खालून नको आणि वरून नको. टेकडीवरून रस्ताच नको. टेकडीचे काहीच नुकसान करायचे नाही.'' यावरून मेधाताई यांची भूमिका स्पष्ट होत आहे. तिन्ही प्रकल्पांना विरोध 

वेताळ टेकडीवरून बालभारती रस्ता आणि अजून दोन बोगदे प्रस्तावित आहेत. या तिन्ही प्रकल्पांमुळे टेकडीचे मोठे नुकसान होणार आहे. हजारो झाडे तोडली जातील. तिथे पक्ष्यांचा अधिवास आहे. तो नष्ट होणार आहे. म्हणून टेकडी वाचविण्यासाठी नागरिक तिन्ही प्रकल्पांना विरोध करत आहेत. मेधा कुलकर्णी यांनी देखील याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटील