शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

MC Stan: ताडीवाला रस्त्यात राहणारा एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस’चा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 14:22 IST

स्टॅन म्हणजे वाया गेलेला मुलगा अशीच त्याची अवघ्या कॅम्प परिसरात ओळख होती...

- विक्रम मोरे

लष्कर (पुणे) : शाळेला दांडी मारणे, अभ्यास न करणे, दिवसभर घराबाहेर आणि रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मित्रंसोबत गाणे गात बसणे, भाषा अगदीच भाईगिरीची त्यात अनेक अश्लील शब्दांचा लाखोली, त्यामुळे वडिलांचा सतत मार खाणारा. अशा व्यक्तिमत्त्वामुळे स्टॅन म्हणजे वाया गेलेला मुलगा अशीच त्याची अवघ्या कॅम्प परिसरात ओळख होती. मात्र, हाच स्टॅन काल ‘बिग बॉस’चा विनर झाला आणि अवघ्या देशभरातील अनेक तरुण-तरुणीच्या गळ्यातील ताईत बनला.

बिग बॉसच्या सिझन सोळाचा निकाल काल रात्री जाहीर झाला. त्यामध्ये स्टानची घोषणा होताच कॅम्प परिसरासह देशभरातील बिग बॉसप्रेमींनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे पुण्यातील ताडीवाला रस्ता नंतर रमाबाई झोपडपट्टी येथील अतिशय सामान्य कुटुंबात वाढलेल्या स्टान हा बिग बॉसचा विजेता झाल्याने पुण्यातल्या झोपडपट्टीतील तरुणाईनी एकच जल्लोष केला. सात वर्षांपूर्वी स्टॅनच्या वडिलांची मुंबईला बदली झाली आणि तेव्हापासून स्टॅनसह त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.

पंचशील बिल्डिंग, रेल्वे सोसायटी शेजारी ३ रा मजला, खोली क्रं २८ ताडिवाला रस्ता येथे राहणाऱ्या स्टॅनच्या घर हे कालपर्यंत कोणाला माहिती नव्हते. मात्र, स्टॅन बिग बॉस झाला आणि पुण्यातील अवघ्या मीडियासह त्याचे नवे-जुने मित्र, नातेवाईकांनी त्यांचे घर गाठले. मात्र, सध्या स्टानचे कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झाल्याने त्याच्या घरात कोणी नव्हते. मात्र, त्याच्या शेजारी आणि परिसरातील मित्रांनी स्टॅनचे तोंड भरून कौतुक करताना त्याच्या अनेक आठवणी सांगितल्या.

ये लाल्या मेरा दोस्त आयेलाय..

सहा महिन्यांपूर्वी स्टॅन हा पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका मोठ्या कार्यक्रमातील रॅप म्युझिकच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’मध्ये सहभागी झाला होता. त्याचे गाणे ऐकण्यासाठी ताडीवाला रस्त्यावरील त्याचा मित्र अर्जुन ओव्हाळ तिथे पोहोचला. त्यावेळी स्टॅन हा स्टेजवर परफॉर्म करत होता. त्याने अर्जुन आल्याचे पाहताच स्टेजवरून ‘ये लाल्या मेरा दोस्त आयेला है ’असं रॅम्प वर्जनमध्येच म्हणत साऱ्या गर्दीत बालपणीच्या मित्राचा सन्मान केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड