एमबीएचा पेपर १४ जूनला

By Admin | Updated: May 28, 2014 00:44 IST2014-05-28T00:44:11+5:302014-05-28T00:44:11+5:30

पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीएच्या पेपरफुटी प्रकरणानंतर हा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

MBA paper on June 14 | एमबीएचा पेपर १४ जूनला

एमबीएचा पेपर १४ जूनला

पुणे : पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीएच्या पेपरफुटी प्रकरणानंतर हा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पेपर १४ जून रोजी घेण्यात येणार असून १४ हजार विद्यार्थी ही परीक्षा पुन्हा देणार आहेत. दरम्यान, पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी यापुढे पेपर सेटर कडून प्रश्नपत्रिकांची प्रत लेखी घेण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. व्ही. एन. गाडे यांनी ही माहिती दिली. मास्टर्स इन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए)चा मॅनेजमेंट अ‍ॅन्ड इन्फार्मेशन सिस्टिम या विषयाचा पेपर ‘व्हॉटस अ‍ॅप’च्या माध्यमातून फुटला होता. यासंदर्भात, आज डॉ. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली. १४ जून रोजी सकाळी अकरा वाजता पुर्वीच्या बैठकव्यवस्थेप्रमाणे ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ. गाडे यांनी दिली. या परीक्षेसाठी शुल्क विद्यापीठाकडून घेण्यात येणार नाही.(प्रतिनिधी)

Web Title: MBA paper on June 14