शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील सर्व अनधिकृत गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर होणार कारवाई : महापौरांचे प्रशासनाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 19:41 IST

गणेश मुर्ती विक्रेत्यांना पालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणार

ठळक मुद्देमहापालिकेच्या मोकळ्या मैदानातील भाडे व डिपॉझिटही केले कमी 

पुणे : पदपथांंवर अथवा रस्त्यांच्या कडेला गणेश मुर्ती विक्री करिता उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनास बुधवारी दिले आहेत. दरम्यान, या सर्व गणेशमुर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना परिसरातील महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या गणेश मुर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचित केले आहे.     शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी आगामी गणेशोत्सवात गणेश मुर्ती खरेदी करण्याकरिता नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे़ या उद्देशाने रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील तसेच उपनगरातील सर्व पदपथ (फुटपाथ) व रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश मुर्ती विक्रेत्या स्टॉलवर कारवाई करावी असे आदेश महापौरांनी दिले आहे.     दरम्यान, या सर्व स्टॉलधारकांना महापालिकेतील वर्ग खोल्या एका आड एक मोफत उपलब्ध करून दिल्या जातील. याकरिता कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही. मात्र, जोपर्यंत स्टॉल असेल तोपर्यंत अनामत रक्कम म्हणून पाच हजार रूपये घेण्यात येणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. दुसरीकडे प्रत्येक गणेश मुर्ती विक्रेत्यास प्रत्येक गणेश मुर्तीसह एक किलो अमोनियम बायोकार्बोरेट देण्याचे आदेश देण्यात आले असून, या रसायनाचा पुरवठा महापालिकेकडून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.याचबरोबर नागरिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे याकरिता, पालिकेच्या आरोग्य कोठींसह मोठ्या सोसायट्यांमध्ये ही पालिकेच्यावतीने अमोनियम बायोकार्बोरेट हे रसायन पुरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.     ---------------महापालिकेच्या मोकळ्या मैदानातील भाडे व डिपॉझिटही केले कमी     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने रस्त्याच्या कडेला गणेशमुर्ती विक्री स्टॉलला परवानगी न देता, महापालिकेची मैदाने व अ‍ॅमेनिटी स्पेस येथे मंडप उभारणी करून गणेशमुर्ती विक्रीस परवानगी दिली होती. परंतु, याकरिता भाडे व डिपॉझिट रक्कम जास्त असल्याने आत्तापर्यंत केवळ दोनच ऑनलाईन अर्ज आले होते. यामुळे आता महापालिकेने हे भाडे व डिपॉझिट कमी केले असून, दिवसाला असलेले ९७५ रूपये भाडे ५०० रूपये व डिपॉझिटची रक्कम दहा हजार रूपयांवरून पाच हजार रूपये केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सवMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका