शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

तरुणाई ‘किल्लेदारीच्या’ वाटेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 07:00 IST

ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देके टू एस ट्रेकची क्रेझ कायम : राजगड, रायगड  ‘फेव्हरेट’कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी सेल्फी घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी

पुणे : सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांची भटकंती हाडाच्या ‘भटक्या’ ला कायमच खुणावत असते. अशावेळी त्याला ऊन, वारा, पाऊस याची तमा नसते. ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही. खासकरुन तरुणाईच्या ट्रव्हल लिस्ट मध्ये गडकिल्ल्यांची क्रेझ कायम आहे. यातही राजगड, रायगड त्यांचा फेव्हरेट असून सध्या के टू एस ट्रेकला पसंती मिळत आहे. पर्यटन म्हटले की, थायलंड, मलेशिया, सिंगापूर फार तर स्वीझर्लंड अशी नावे सतत डोळ्यासमोर असतात. याकरिता विविध कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीच्या सवलती देखील देतात. मात्र चांगला चार आकडी पगार असणाºया तरुणाईला सहयाद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील गड-किल्ले साद घालताना दिसतात. दर शनिवार-रविवार या दिवशी ठरलेल्या ‘टाईमपास’ गोष्टीतून सवड काढून आता यंग ब्रिगेड गड किल्ल्यांच्या सफरीवर निघाल्याचे दृश्य पाहवयास मिळते. सोशल मीडियावर गड किल्ल्यांविषयीच्या पोस्ट वाचून, व्हिडिओ बघुन अनेकांची पावले गड कोटांच्या दिशेने पडत असल्याचे गड किल्ल्यांचे पर्यटन व पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे शरद बोडके सांगतात, हल्ली महाराष्ट्रातील कुठल्याही गडकिल्ल्यांविषयीची माहिती सोशल माध्यमांवर उपलब्ध आहे. यामुळे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ट्रेकींग किंवा आॅफबीट भटकंती करण्यास ते प्राधान्य देतात. याची काही उदाहरणे द्यायची झाल्यास राजगड, रायगड, तोरणा या किल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यास तरुणाईची पसंती असते. सध्या कात्रज टू सिंहगड अर्थात के टू एस असा  ट्रेक करुन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यास अनेक जण तयार असतात. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत या वेळेत चालणारा हा ट्रेक मात्र चांगलाच दमविणारा आहे. पौर्णिमेनंतर दोन दिवस मोठ्या संख्येने ट्रेकर्स के टू एस कडे धाव घेतात. कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. इतर परंपरागत व साचेबंद अशा किल्ल्यांपेक्षा आडेवाटेवरील गडकोटांच्या ‘वाटेला’ जाण्याची इच्छा त्यांना खुणावत असते. अंधारबन कला देखील मोठ्या संख्येने पर्यटक येतात. खऱ्याखुऱ्या जंगलाचा अनुभव आणि अरण्यातील शांतता अनुभवण्यासाठी याप्रकारच्या साहसी प्रवासात यंग ब्रिगेड सहभागी होताना दिसते. विशेषत: आयटी सेक्टर, बँकिंग, मार्केटींग, क्षेत्रातील तरुणाईला शनिवार-रविवार यादिवशी नेहमीच्या सहलीपेक्षा काहीतरी भन्नाट प्रवासाची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून जंगले व गडकिल्ल्यांची निवड केली जात आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील काही भाग जैवविविधतेच्या दृष्टीने ‘संरक्षित’ केला आहे. यात अंधारबन व वासोटा येथील जंगलाचा समावेश आहे. याठिकाणी जावून निसर्ग पर्यटनाचा आगळा वेगळा आनंद घेण्याकडे युवा भटकत्यांचा आहे. चौकटसेल्फिचा नाद येतो जीवाशीनवशिके तरुण पर्यटक अल्लडपणा करतात. त्यामुळे निसर्गाची हानी तर होतेच याशिवाय त्यातील जैवविविधता धोक्यात येते. याची पर्वा त़रुण करताना दिसत नाही. अनेक जागी कचरा करतात. वातावरणातील ध्वनितरंगांच्या माध्यमातून प्राणी व पक्षी संवाद साधतात. मात्र पर्यटकांच्या गोंगाटामुळे त्यांच्यातील संवाद प्रक्रियेला अडथळा येतो. सगळ्यात महत्वाचे सेल्फी घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी होत असून ब-याचवेळा तो नाद जीवाशी येत असल्याच्या घटना घडत आहे.  - शरद बोडके, हौशी पर्यटक व पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेFortगडWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन