शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Maval Lok Sabha Result 2024:मावळचे खासदार श्रीरंग बारणे; घासून नाही तर ठासून आले, दीड लाख मतांनी विजयी

By विश्वास मोरे | Updated: June 4, 2024 16:34 IST

Maval Lok Sabha Result 2024 'घासून नाही'तर ठासून बारणे आले, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली आहे

Maval Lok Sabha Result 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची शेवटची फेरी पूर्ण झाली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सविस्तर निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. घासून वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी असल्याचे दिसून आले. शेवटच्या फेरीत दीड लाख मते मिळवत विजयी वाटचाल केली आहे. 'घासून नाही'तर ठासून बारणे आले, अशी प्रतिक्रिया बारणे  (Shrirang Barne) यांनी दिली आहे. संजोग वाघेरे हे २ नंबरला होते. त्यांचा पराभव झाला आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल सुरू आहे.  सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली सुरुवातीच्या कालखंडामध्ये मतमोजणीचा वेग कमी होता. पहिल्या फेरीचा निकाल येण्यास दहा वाजले.

या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे (Sanjog Waghere Pati) यांच्यासह ३३ उमेदवार रिंगणात होते.(Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil) पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे यांची आघाडी कायम होती. दुपारी साडेतीनपर्यंत दुपारी अडीच पर्यंत २५ फेऱ्या झाल्या होत्या मात्र, त्यांचे निकाल बाहेर आले नव्हते. पोलिंग एजंटच्या माहितीनुसार बारणे यांनी दीड लाखांनी बारणे विजयी झाले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. सव्वादोनच्या सुमारास श्रीरंग बारणे मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. 'झाली रे झाली हॅट्रिक झाली, असा जल्लोष समर्थक यांनी केला. भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. 

 का झाला निकाल जाहीर होण्यास उशीर!

मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या वेळेस काही यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे दुपारी निकाल जाहीर होण्याचे काम थांबले होते. तांत्रिक अडचणीमुळे निकाल जाहीर होण्यास उशीर होत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

 महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय देतो!

 खासदार बारणे म्हणाले, मावळच्या जनतेने तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. मावळमधील सहाही आमदार, कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केले. त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. दहा वर्षे मतदारसंघात जनतेशी, नागरिकांशी एकरूप राहून काम केले. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. शहरात माझा एक लाख हक्काचा मतदार आहे. शहरातील जनतेने पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकला. मावळच्या जनतेचे आभार मानतो. राज्यातील चित्र वेगळे असताना माझा लाखोच्या फरकाने विजय होत आहे. लोकांशी एकरूप राहून काम केल्याचा विजय आहे. मतदारांना, महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय देतो.'

टॅग्स :Puneपुणेmaval-pcमावळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४sanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटीलshrirang barneश्रीरंग बारणे