शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मॉरिशसने महाराष्ट्रासमोर निर्माण केला आदर्श...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:42 IST

'हा जावई' या नाट्यप्रयोगासाठी मॉरिशसमधील कलाकार महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. डिव्हाइन कॉझ सोशल फाउंडेशन आणि यानिमित्त या कलाकारांशी झालेल्या संवादात त्यांनी मॉरिशसमधील मराठी संस्कृतीची भरभरून माहिती दिली.

ठळक मुद्दे'मॉरिशसमध्ये चाळीस वर्षांपासून नाटकाचे वातावरण आहे. आम्ही विविध विषयांवर मराठी नाटके लिहितो आणि सादर करतो.

पुणे :  साहित्यसृष्टीतील काही मान्यवर लेखक, विचारवंत यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले. नुकत्याच गुजरात येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात देखील अभिजाततेचा मुद्दा चर्चिला गेला. हे सगळं महाराष्ट्रात होत असताना दुसरीकडे आपल्या अभिजात मराठी भाषेसह मराठमोळी संस्कृती टिकविण्यासाठी मॉरिशस मधील मराठी बांधव धडपडत असून, आपल्या कृतीतूनच त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रयत्नांना मॉरिशस सरकारनेही सहकार्याचा हात दिला आहे. मराठी टिकवा आणि पुढे न्या यासाठी तिथले शासन आग्रही आहे. मॉरिशस सरकार आणि  तिथल्या मराठी बांधवांनी महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.     'हा जावई' या नाट्यप्रयोगासाठी मॉरिशसमधील कलाकार महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. डिव्हाइन कॉझ सोशल फाउंडेशन आणि यानिमित्त या कलाकारांशी झालेल्या संवादात त्यांनी मॉरिशसमधील मराठी संस्कृतीची भरभरून माहिती दिली. आपल्याकडे मराठी नाटक आणि नाटकाला रसिकांची असलेली उपस्थिती यावरुन अनेकदा उलट सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. शुक्रवारच्या सायंकाळी परदेशी पाहुण्यांनी मात्र, मराठी 'हा जावई' या नाट्यप्रयोगासाठी मॉरिशस मधील कलाकार महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.डिव्हाइन कॉझ सोशल फाउंडेशन आणि यानिमित्त या कलाकारांशी झालेल्या संवादात त्यांनी मॉरिशसमधील मराठी संस्कृतीची भरभरून माहिती दिली. आपल्याकडे मराठी नाटक आणि नाटकाला रसिकांची असलेली उपस्थिती यावरुन अनेकदा उलट सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. शुक्रवारच्या सायंकाळी परदेशी पाहुण्यांनी मराठीमधून नाटक सादर करून रसिकांना सुखद धक्का दिला. मॉरिशसमधील मराठी कलाकारांनी महाराष्ट्रात येऊन नाट्यप्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्याकडील राज्यशासन स्वतंत्र भाषा विद्यापीठाची घोषणा करते. परंतु, पुढे त्याची कु ठलीही कारवाई होत नाही. आपल्याकडे मराठी भाषेचा वापर फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याकरता करतो. याउलट 'मॉरिशस सरकारच्या कला-संस्कृती विभागाने दहा वर्षांपूर्वी मराठी भाषिक संघ स्थापन केला. तिथे मराठीसाठी सरकार निधी देते. काही करा; पण मराठी भाषेची प्रगती झाली पाहिजे,असे सरकारचे धोरण आहे. सरकारने  मॉरिशस सांस्कृतिक केंद्राची स्थापना केली आहे,ही प्रत्येक मराठीप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.' याविषयी अधिक माहिती देताना मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतळाजी म्हणाले की, १८० वर्षांपासून 'मॉरिशसमध्ये मराठी संस्कृती आहे. पूर्वजांनी कुलदैवत, भाषा, संस्कृती, दशावतार,गोंधळ, जागरण, धर्म ही सारी परंपरा जोपासली. पूर्वी रात्रभर जागरण गोंधळाचे कार्यक्रम होतं. आमची चौथी पिढी मॉरिशसमध्ये असून सर्वजण मराठीमध्ये बोलतात. आम्ही मॉरिशन मराठी आहोत. तिथे आफ्रिका आणि पाश्चात्य देशांचा प्रभाव आहे. त्या वातावरणात आम्ही मराठी लोक तेथील आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, न्यायपालिका, व्यापार अशा सर्व क्षेत्रांमध्ये उच्चस्थानी आहेत. प्रत्येक सरकारमध्ये एक तरी मराठी माणूस मंत्री असतो.  ..........आदान प्रदान वाढले पाहिजे'मॉरिशसमध्ये चाळीस वर्षांपासून नाटकाचे वातावरण आहे. आम्ही विविध विषयांवर मराठी नाटके लिहितो आणि सादर करतो.चारशे कलाकार तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील नाटकांचे प्रयोग तिकडेकधीतरी होतात. आम्ही काय बदल केला पाहिजे, हे त्यातून कळते; पण हे आदान-प्रदान वाढले पाहिजे , अशी भावना नाटकातील कलाकारांनी व्यक्त केली.     

टॅग्स :Puneपुणेentertainmentकरमणूक