शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मावळातील जमीनमालकांची बोगसगिरीने उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:38 IST

परस्परविक्रीचे वाढले प्रकार : तालुक्यामध्ये २५ गुन्हे दाखल, खोटी कागदपत्रे बनविण्याचे प्रकार

विजय सुराणा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जमिनीला सोन्याचे भाव आले असून, झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने बोगस कागदपत्रे बनवून जमीनमालकाला थांगपत्ता न लागता त्याची जमीन परस्पर विकायचा धंदा काही टोळ्यांनी अधिकारी व एजंटांना हाताशी धरून चालू केला आहे. यामुळे मूळ जमीनमालकांची झोप उडाली आहे. वर्षभरात याबाबत मावळ तालुक्यात २५ गुन्हे दाखल झाले आहेत.

तालुक्यात गेल्या दहा वर्षांत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले असून, या जमिनी खरेदी करणारे काहीजण परराज्यांत व बाहेरगावी राहतात. काही जणांनी जमिनी घेतल्यानंतर त्यानी नावावर जमिनीची नोंदही केली नाही, तर काहींनी नोंद केली आहे; परंतु घेतलेल्या जमिनीकडे परत ढुंकूनही पाहिले नाही, अशा जमीनमालकांच्या जमिनी परस्पर विकून लाखो रुपये कमवून झटपट श्रीमंत होण्याच्या धंदा जोमाने सुरू झाला आहे. काही जमीनमालकांना आता जाग आली असून, आपल्या जमिनीचा ७/१२ उतारा पाहिल्यावर त्यावर दुसऱ्याचे नाव दिसून येत असल्याने त्यांची झोप उडाली. अनेक जमीनमालकांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली.मावळ तालुक्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेल्या लोणावळा-खंडाळा येथे जमिनीचे भाव इंचावर आहेत. या भागात काही मंत्री अभिनेते यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्या आहेत. यातील संगीतकार प्यारेलाल यांचीही फसवणूक झाली होती. पवना धरणालगत पवन, आंदर व नाणे मावळ अशा तिन्ही मावळसह तळेगाव व टाकवे औद्योगिक क्षेत्रात जमिनीला सोन्याचा दर आला आहे.या वर्षभरात बोगस जमीन खरेदीप्रकरणी वडगाव ठाण्यात ६, कामशेत येथे ४, लोणावळा ग्रामीण येथे ८, लोणावळा शहर ३, तर तळेगाव येथे ५ असे गुन्हे दाखल आहेत. वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी एका महिन्यात चार गुन्हे दाखल करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. येत्या काही दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालयातील काही संबंधित अधिकारी व एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हाके यांनी दिली. याबाबत वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक जे. डी. बडगुजर म्हणाले, की आतापर्यंत जी बोगस खरेदीखते झालीत, त्याची आम्हाला माहिती नव्हती. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यावर माहिती पडले.खरेदीखत करताना मूळ ओळखपत्र, पॅन कार्ड,आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी पाहिले जाते.पॅन कार्ड आॅनलाइन तपासून घेतो.परंतु आम्ही सर्वच जमीनमालकांना ओळखत नाही. सध्या खरेदीखत करताना मूळ मालकाचे आधार कार्ड घेतल्याशिवाय आम्ही खरेदीखत करत नाही. पुढे कागदपत्रांच्या बाबतीत आम्हाला संशय आल्यास पोलिसांना कळवू. संबिधतांवर योग्य कारवाई केली.दुय्यम निबंधक कार्यालयात टोळ्या सक्रिय४मावळ तालुक्यात काही छोट्या-मोठ्या टोळ्या बोगस जमीन व्यवहार करण्यासाठी तसेच जमिनींचा ताबा मिळून देण्यासाठी सक्रिय झाल्या असून, बोगस खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकाºयांसह एजंट यामध्ये सामील झाले आहेत.बोगस खरेदीखत केल्यानंतर त्या जमिनीची नोंद करण्यासाठी संबंधित तलाठी व सर्कल यांना नोटांचे बंडल देऊन जमिनीची नोंद केली जाते. हा धंदा जोमात सुरू आहे. एका महिन्यापूर्वी पुण्याचे माजी आमदार नारायण श्रीपाद वैद्य यांची ११ गुंठ्यांचे खरेदीखत करण्याऐवजी १५३ गुठ्यांचे खरेदीखत केले. याप्रकरणी तीन जण अटक आहेत. नाणे मावळातील उकसान येथील एका शेतकºयाचे साठेखत करून घेण्याऐवजी खरेदीखत केले या प्रकरणी कामशेत पोलिसांनी चार जणांना अटक केली. तालुक्यात हाधंदा राजरोसपणे चालू आहे. काहीजण गुंडगिरीच्या दहशतीने घाबरतात. 

टॅग्स :Puneपुणे