शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निविदा काढूनच खरेदी करणार गणित प्रणालीचे साहित्य; टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका ताळ्यावर

By राजू हिंगे | Updated: January 12, 2025 18:30 IST

पुणे महापालिकेच्या शाळेमधील मुलांचे गणित पक्के व्हावे यासाठी एका संस्थेने अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य तयार केले आहे

पुणे : महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचा गणिताचा पाया चांगला करण्यासाठी महापालिका एका संस्थेकडून अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य विकत घेणार आहे. त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविताच तब्बल १ कोटी ३४ लाखांचे काम या संस्थेस दिले जाणार होता. यासाठी निधी नसल्याने चक्क शिक्षण विभागाकडून पालिकेच्या शाळांमधील गुणवंत मुलांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. पण यावर टीकेची झोड उठताच शैक्षणिक प्रणाली ही ठरावीक संस्थेकडून न घेता निविदा प्रक्रिया राबवून त्यानंतरच घेतली जाणार असल्याची भूमिका आता महापालिकेने घेतली आहे.

पुणे महापालिकेच्या शाळेमधील मुलांचे गणित पक्के व्हावे यासाठी एका संस्थेने अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणालीचे साहित्य तयार केले आहे. या साहित्यास एचसीआरटीने मान्यता दिली असून, राज्यातील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यास हरकत नसल्याची शिफारसही केली आहे. त्यानुसार, शिक्षण मंडळास या शाळेने पत्र दिले होते.राज्य शासनाच्या एका माजी मंत्र्यांकडेही याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडूनही महापालिकेस याबाबत पत्र प्राप्त झाले होते. या प्रणालीसाठीच्या शैक्षणिक साहित्याचा दर प्रती ५० मुलांसाठी १५३ रुपये ४० पैसे आहे. त्यानुसार, महापालिकेने पहिली ते आठवीच्या मुलांची संख्या अंदाजे ८८ हजार असून, या सर्वांसाठी संच घेण्याकरिता १ कोटी ३४ लाख ९९ हजार २०० रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला होता. त्यावरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. अखेर ही शैक्षणिक प्रणाली खरेदी करताना ठराविक संस्थेकडून न घेता निविदा प्रक्रिया राबवून याची खरेदी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या