शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य वारसा होणार जतन; ‘मसाप’तील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:49 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळग्रंथांचा त्यात समावेश आहे.

ठळक मुद्दे मसाप संकेतस्थळावरील ई-ग्रंथालयात हा अनमोल ठेवा वाचकांसाठी होणार उपलब्ध या दुर्मीळ ग्रंथाचे डिजिटायजेशन लोकसहभागातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : शतकोत्तर दशकपूर्तीचा टप्पा पार केलेल्या आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळग्रंथांचा त्यात समावेश आहे. या कामासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे सहकार्य साहित्य परिषदेला लाभले आहे. या ग्रंथांचे डिजिटायजेशन पूर्ण झाल्यानंतर मसाप संकेतस्थळावरील ई-ग्रंथालयात हा अनमोल ठेवा वाचकांसाठी, संशोधकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहे.परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव असलेले (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय नेहमीच संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. ५०,०००हून अधिक मौलिक संदर्भग्रंथांनी समृद्ध असलेल्या या ग्रंथालयात साहित्यप्रेमी वाचकांबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नेहमीच राबता असतो. दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचे दुर्मीळ ग्रंथ हाताळणे जिकीरीचे झाले होते. हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी परिषदेच्या कार्यकारी मंडळाने या दुर्मीळ ग्रंथाचे डिजिटायजेशन लोकसहभागातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यासाठी ग्रंथ दत्तक घेण्याचे आवाहनही साहित्यप्रेमींना केले. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. निधी अभावी काम अडू नये यासाठी कार्यकारी मंडळानेच पुढाकार घेतला. कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांनी प्रत्येकी ११ ग्रंथ दत्तक घेण्याचा तर कार्यकारी मंडळातील इतर सदस्यांनी प्रत्येकी एक ग्रंथ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यातून या प्रकल्पाला गती मिळाली. ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे म्हणाले, की परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि निखिलेश कुलकर्णी यांच्या बरोबरच्या बैठकीत डिजिटायजेशनसाठी सहकार्याचा भांडारकर संशोधन मंदिराने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनच्या साह्याने हे डिजिटायजेशनचे काम पूर्ण होणार आहे. या सहकार्याबद्दल परिषद भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या कायम ऋणात राहील.

कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा इतिहास परिषदेचे संस्थापक चिटणीस कै. वा. गो. आपटे यांच्या नावाचा 'वा. गो. आपटे इस्टेट ट्रस्ट' सदाशिव पेठेत होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष श्री. म. माटे यांनी त्या ट्रस्टच्या विश्व्स्तांशी संपर्क साधून १९४९ साली १०,००० रुपयाची देणगी मिळवली, ट्रस्टच्या अटीनुसार आपटे यांच्या स्मरणार्थ संदर्भ ग्रंथालय उभारण्यात आले. १९५१च्या मे महिन्यात वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाची प्रतिष्ठापना झाली. या ग्रंथालयातून दुर्मीळ आणि संदर्भात्मक ग्रंथ सोडून कोणतेही पुस्तक सभासदांना घरी वाचण्यासाठी दिले जाते. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायजेशन करण्यासाठी परिषदेने सुरु केलेल्या 'ग्रंथ दत्तक योजनेला' साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशीPuneपुणे