इंदापूर तालुका दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखेच्या वतीने माता रमाई स्मृतिदिनानिमित्त ऑनलाइन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूर महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शीतल माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ओव्हाळ यांनी 'त्यागमूर्ती माता रमाई' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान दिले. ऑनलाइन कार्यक्रमामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. जीवन सरवदे, तालुका सरचिटणीस प्रा. श्रीनिवास शिंदे, कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक दिलीप सरोदे, आर. डी. गायकवाड, सुधाकर सरदार, राजरत्न थोरात, प्रा. डॉ. राजेंद्र भोसले, प्रा. जयश्री सरवदे, प्रा. विजय रणपिसे, प्रा. धनंजय भोसले तसेच सुवर्णा शिंदे, सलुजा भोसले उपस्थित होते. प्रास्ताविक कीर्तीरत्न सुधीर मखरे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा सुहास मोरे यांनी केले. प्रतिभा रवींद्र साबळे यांनी आभार मानले.
माता रमाई स्मृतिदिनी ऑनलाइन प्रवचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST