शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारूती चितमपल्ली यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:46 IST

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमांडणार विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध ठराव लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन

पुणे : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची निवड करण्यात आली आहे. ‘हे संंमेलन विविध कार्यक्रमांनी रंगणार असून, विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध ठराव मांडणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे.  उद्घाटन सत्रानंतर 'चंगळवादी वृत्ती आणि पर्यावरण' या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर 'प्रदुषित नद्या आणि आपण' या विषयावर परिणिता दांडेकर बोलणार आहेत. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण  होणार असून,  उत्तरार्धात अंकुश आरेकर व लता ऐवळे हे 'रानातल्या कविता' सादर करणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रिया चित्राव यांचा 'हिरवाई' हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण होणार असून,  संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होणार आहे. जयंत कर्णिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत संमेलन होणार आहे. महाविद्यालयीन युवकांचा सहभाग हे संमेलनाचे वैशिष्ट्य असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.ठरावांची अमंलबजावणी होणारसाहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वत: च्या जीवन शैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक-अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत. या ठरावांची अमंलबजावणी होईल, असे मिलिंद जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे