सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत विनामास्क कारवाई, विविध अास्थापना, मंगल कार्यालये या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन होत आहे का, हे पाहण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस शिपाई दीपक काशिद, शरद कुलवडे पेट्रोलिंग करत असताना दि.७ रोजी दुपारी २.३५ वा. जांभोरी गावचे हद्दीत एका घरासमोर लग्न समारंभात २५० ते ३०० लोक मास्क न लावता, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करता सहभागी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुलीचे वडील तुकाराम आवजी केंगले रा. जांभोरी गावठाण यांचेवर कलम १८८, २६९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार जिजाराम वाजे, मनीषा तुरे करत आहे.
धुमधडाक्यात लग्न, एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:10 IST