शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समुपदेशक अनिल भागवत यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 21:45 IST

‘वैवाहिक समुपदेशन’ या विषयात डॉक्टरेटचे काम पूर्ण केले. इंग्लंड आणि अमेरिकेत पालक शिक्षण व विवाह शिक्षणाच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या.

 पुणे : ’विवाह समुपदेशक आणि जीवनसाथ अभ्यासमंडळाचे प्रमुख सल्लागार अनिल भागवत यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सात महिन्यांपूर्वी भागवत यांना हदयविकाराचा झटका आला होता. त्यामध्ये त्यांचे हदय कमकुवत झाले होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. भागवत यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता. मात्र, त्यांचे हदय उपचाराला विशेष साथ देत नव्हते. मंगळवारी उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल भागवत यांनी अमेरिकेत बांधकाम व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण करून नोकरी केली. अमेरिकन ग्रीन कार्ड होल्डर असूनही त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात अतिजलद आणि दर्जेदार बांधकाम व्यवस्थापनाचा अनेक वर्षे व्यवसाय केला. त्यांनी ‘वैवाहिक समुपदेशन’ या विषयात डॉक्टरेटचे काम पूर्ण केले. इंग्लंड आणि अमेरिकेत पालक शिक्षण व विवाह शिक्षणाच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या. जीवनसाथ समुपदेशन केंद्राचे प्रमुख समुपदेशक , पालक विद्यापीठाचे सल्लागार म्हणून ते कार्यरत होते.  ‘घर पहावं बांधून’,  ‘लग्न पहावं करून’, ‘व्यवस्थापनशास्त्र तुमच्यासाठी’, ‘विवाहज्ञानकोश’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. ‘जीवनसाथ- भाग 10’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या मागे ’बालभवन’च्या संस्थापिका शोभा भागवत, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.          

टॅग्स :Puneपुणे