शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विषारी तणनाशक घेऊन विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांंविरुद्ध बावड्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 17:25 IST

सासरच्या होणाऱ्या मानसिक व शारीरिक, आर्थिक त्रासाला कंटाळून अमृता सचिन कुर्डे (वय २२) या विवाहितेने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बावडा येथे घडली.

ठळक मुद्देसासरच्या पाच जणांविरुद्ध बावडा पोलिसांत गुन्हा दाखल अमृता हिचा सुमारे अडिच वर्षापूर्वी झाला होता विवाह; त्यांना शौर्य नावाचा दीड वर्षाचा मुलगा

बावडा : सासरच्या वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक, आर्थिक त्रासाला कंटाळून अमृता सचिन कुर्डे (वय २२) या विवाहितेने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बावडा येथे घडली. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध बावडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृताचे वडिल पांडूरंग दामू राऊत (रा. इंदापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नवरा सचिन दत्तात्रय कुर्डे, सासरा दत्तात्रय राघू कुर्डे, सासू जायबाई दत्तात्रय कुर्डे, दीर राहुल दत्तात्रय कुर्डे, नणंद आश्विनी दत्तात्रय कुर्डे यांचा समावेश आहे. यापैकी चौघांना बावडाचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण यांनी तत्काळ ताब्यात घेतले. मृत अमृता हिने काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राऊंडअप हे शेतीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध घेतल्याने तिला उपचारार्थ अकलूज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ५ वाजता तिचे निधन झाले. या घटनेने अमृताच्या माहेरचे लोक प्रक्षुब्ध झाले होते. तिचे अंत्यसंस्कार घराच्या ओट्यावरच करण्याचा निर्धार केला होता त्यामुळे वातावरण तापले होते. मात्र इंदापूरचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी परिस्थिती हाताळून माहेरच्यांची समजून काढली व वातावरण शांत केले. नंतर घरालगतच्या मौकळ्या प्रांगणात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अमृता हिचा सुमारे अडिच वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना शौर्य नावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे. तिला सुरुवातीस चांगले वागवण्यात आले. मात्र नंतर तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच खर्च केला नाही, घरात काम करत नाही, हुंड्याचे राहिलेले एक लाख रुपये माहेरुन आणत नाही या कारणांवरून शिविगाळ, दमदाटी, मारहाण करुन शारीरिक व मानसिक त्रास दिला तसेच उपाशीपोटी ठेवले. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची  त्यावरून आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सजन हंकारे करीत आहेत.

शौर्यचा हंबरडामृत अमृता हिस सुमारे दीड वर्षाचा शौर्य नावाचा मुलगा आहे. आपल्या आईचा मृतदेह चितेवर ठेवला, त्यावेळी त्याच्या हातूनच आईला पाणी पाजण्यात आले. हे भीषण दृष्य बघून या चिमुरड्याने आई-आई म्हणत हंबरडा फोडला. हे दृष्य बघून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. तर महिलांनीही आक्रोश केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणे