शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठीचे विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत; परीक्षा देण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 13:13 IST

हजेरीसंबंधी विद्यापीठाने खुलासा करण्यास उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितले आहे. मात्र, अनेक दिवस उलटले तरी प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला नाही. परीक्षा सुरू असताना त्याचा निर्णय होत नसल्याने मराठी विभागाचे अनेक विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देकेवळ मराठी विभागाकडूनच कारवाई का, यावर प्रश्नचिन्हहजेरी न भरल्याप्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांची नेमण्यात आली होती समितीअनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती असतानाही त्यांना परीक्षेला बसू दिलेले नाही, विद्यार्थ्यांचा आरोप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नियमानुसार एक महिन्याची नोटीस का दिली नाही, याचा विद्यापीठाने खुलासा करण्यास उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी सांगितले आहे. मात्र, अनेक दिवस उलटले तरी अद्याप प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला नाही. एकीकडे परीक्षा सुरू असताना त्याचा निर्णय होत नसल्याने मराठी विभागाचे अनेक विद्यार्थी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने अचानक ७५ टक्के हजेरीच्या नियमावर बोट ठेवून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा बसण्यास मनाई केली आहे. वस्तुत: ७५ टक्के हजेरीचा नियम विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व विभाग व सर्व महाविद्यालये यांना लागू आहे. मात्र केवळ मराठी विभागाकडूनच ही कारवाई का केली जात आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मराठीच्या काही विद्यार्थ्यांनी विभागाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन केल्याने जाणीवपूर्वक त्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची कारवाई केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.परीक्षेला बसू न देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविरुद्ध दाद मागितली. त्या वेळी नियमानुसार विद्यार्थ्यांना एक महिना अगोदर नोटिसा बजावणे आवश्यक असताना ती बजावल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे याबाबत खुलासा करावा, असे पत्र संचालकांनी विद्यापीठाला पाठविलेले आहे. मात्र, प्रभारी कुलसचिव परदेश दौऱ्यावर असल्यामुळे अद्याप पत्र पाठविण्यात आलेले नाही. मराठी विभागाकडून हजेरीपत्राचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यात आलेले नाही. अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती असतानाही त्यांना परीक्षेला बसू दिलेले नाही, तर काही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असतानाही त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनाच टार्गेट करण्यासाठी हा कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हजेरी न भरल्याप्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु समितीने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय देणे आवश्यक असताना एक पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढचे पेपर देण्यास मनाई केली आहे. 

 

आंदोलन केल्याने केले टार्गेट विद्यार्थ्यांना निकाल दाखवावा यासाठी मराठी विभागातील काही विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्याचबरोबर तिथल्या क्लार्ककडून योग्य वागणूक मिळत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक काही विद्यार्थ्यांना टार्गेट करून परीक्षेला बसू दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

अंतिम हजेरीपत्रच लावले नाहीमराठी विभागाच्या दोन विषयांचा अपवाद वगळता इतर विषयांच्या हजेरी नियमित घेण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या हजेरीचे अंतिम हजेरीपत्रक विभागाकडून लावण्यात आले नाही. नियमानुसार एक महिन्याची नोटीस देणे अपेक्षित असताना परीक्षा सुरू असताना हॉलमधून बाहेर काढण्यात आले, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांच्याकडे केल्या आहेत.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे