शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्यातही मराठी शाळा ओस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:25 IST

महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यात चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत.

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यात चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या एकमेव सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.एकीकडे ‘मराठी वाचवा’चे नारे आणि दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पूर यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. शासनाचे उदासीन धोरण, पालकांचा इंग्रजी माध्यमांकडील वाढता कल या समस्यांचा बडोद्यातील मराठी शाळाही सामना करत आहेत. साडेचार लाख मराठी बांधवांची लोकसंख्या असलेल्या बडोद्यामध्ये जे. एम. ज्युनियर हायस्कूल, महाराणी चिमणाबाई हायस्कूल, एच. जे. परिख मॉडेल हायस्कूल, महाराणी हायस्कूल फॉर गर्ल्स या केवळ चार मराठी शाळा अस्तित्वात होत्या. गेल्या ४-५ वर्षांमध्ये यापैकी तीन शाळा बंद पडल्या आहेत.१९११ मध्ये स्थापन झालेल्या आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे माजी विद्यार्थी असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेमध्ये सध्या ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बडोदा शहराचा विस्तार झाल्याने अनेक निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांचे दूरवर स्थलांतर झाले. या कुटुंबातील मुलांना शाळेला येण्या-जाण्याचा खर्च परवडत नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थीसंख्येवर होत आहे. त्यामुळे ही संख्या टिकवून ठेवण्यासाठी मुलांना ने-आण करणाºया रिक्षाच्या भाड्यात ५० टक्के सवलत पुढील शैक्षणिक वर्षापासून देण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे. यामुळे तरी पालक आणि विद्यार्थ्यांचा मराठी शाळेकडील ओढा टिकून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन