शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 16:48 IST

हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

पुणे : संतांचे विचार कालसापेक्ष आहेत, काळाच्या कसोटीवर ते विचार योग्य ठरतात असे केवळ म्हणून चालणार नाही. त्या त्या काळाचा अनुभव, सत्य, विचार, वास्तविकता याच्या आधारावर संत साहित्याचे पुन्हा पुन्हा लिखाण होणे आवश्यक आहे. त्याव्दारे हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

श्री गंधर्व वेद प्रकाशनतर्फे संत निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायपर्यंतच्या संत परंपरेची ओळख करून देणा-या १३ चरित्र ग्रंथांचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कीर्तन-प्रवचनकार चैतन्यमहाराज देगलूरकर, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रंथाचे संपादक डॉ सदानंद मोरे आणि अभय टिळक, प्रकाश खाडिलकर, दीपक खाडिलकर आदी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या विचारांवर संत साहित्याचा पगडा आहे. मराठी भाषा समृध्द झाली ती संत परंपरेमुळे. ज्ञानोबारायांनी त्याची सुरूवात केली. बदललेल्या काळातही संत साहित्याचा विचार महत्त्वाचा आहे. नव्या पिढीवर या साहित्याचा प्रभाव पडावा यासाठी त्या पिढीला विचार कळेल अशा भाषेत ते साहित्य लिहले गेले पाहिजे. संतांनी अध्यात्म आणि भौतिक जीवन यांचे सांगड घातली. संत साहित्यामुळे आमचा विचार, संस्कृती, भाषा अनेक आक्रमणांनंतरही जिवंत राहिली.’’

 चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे.  तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

औसेकर महाराज म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला पाचशे वर्षांची संत परंपरा आहे, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्याचे काम केले. या संतांची चरित्रे आजच्या नव्या दृष्टिकोनातून लिहिण्याची गरज होती. अनेक नवे जुने प्रख्यात लेखकांचा यामध्ये समावेश आहे. राज्याचा सामाजिक पोत घडविण्यात संतांचे फार मोठे योगदान आहे.’’अभय टिळक यांनी सुत्रसंचालन केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस