शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण; एसटी भरती प्रक्रियेसाठी ‘बी प्लॅन’ तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 04:06 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भरती प्रक्रियेसाठी ‘बी प्लॅन’ तयार केला आहे.

राजानंद मोरे पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भरती प्रक्रियेसाठी ‘बी प्लॅन’ तयार केला आहे. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली तरी या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना हमखास नोकरी मिळणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शहर बस सेवेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यानंतर त्यांना एसटी महामंडळाच्या सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’ला दिली.दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील बेरोजगार तरूणांसाठी एसटी महामंडळाकडून चालक व वाहकांच्या तब्बल ४ हजार ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (मराठा आरक्षण) दिलेल्या १६ टक्के आरक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. या आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविणारे महामंडळ पहिली संस्था ठरले आहे. भरतीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या प्रक्रियेत १६ टक्के आरक्षणानुसार ५०४ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यावर केवळ मराठा समाजातील तरूणांनाच संधी मिळणार आहे.शासनाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली नसली तरी हिरवा कंदीलही दाखविलेला नाही. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मराठा आरक्षणाचा ‘बी प्लॅन’ तयार केला आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. भरतीबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.औरंगाबाद स्मार्ट सिटीअंतर्गत शहर बस सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेची पाच वर्षांची जबाबदारी महामंडळाकडे आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.>कंत्राटी नियुक्तीचा पर्याय उपलब्ध‘शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गात निवड झालेल्यांच्या बाबतीत मराठा आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेणे शक्य नसल्यास त्यांना औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत चालविण्यात येणाºया शहर बस वाहतुकीकरिता १५ हजार रुपये रकमेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा पर्याय उपलब्ध राहील,’ असे जाहिरातीत म्हटले आहे.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावते