शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Maratha Reservation : सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही!- उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 9:54 AM

Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित

पुणे - मराठा आरक्षणावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.  सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही, असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या सरकारनं त्यांच्याकडे आणि त्यांनी यांच्याकडे बोटे दाखवायची. अशी किती वर्ष टोलवाटोलवी करणार? आता एकमेकांकडे बोटे दाखवणे बंद करा. उद्या धमाका झाल्यास त्यास कोण जबाबदार?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असंही  उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं. 

उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद मी काही नेता नाही, मला कोणतीही प्रसिद्धीच्या नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात दिली. यावेळी ते म्हणाले की, आंदोलनाला दिशा देण्यासाठी ही परिषद असेल. तिथे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेल. मात्र ही दिशा हिंसक नसावी. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी नसणार आहे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माफक अपेक्षा आहे ते जर वेळेत मिळाले असते तर लोकांना जीव द्यावे लागले नसते अशी टीकाही त्यांनी केली.

उदयनराजे भोसले यांनी मांडलेले मुद्दे

उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित 

- पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका

- दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही

- उद्या जर धमाका झाला तर जबाबदार कोण? टोलवाटोलवी करणारे का?

- आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा भडका उडेल!

- आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय? दरोडा, खुनाच्या केसेस

- ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी

- प्रत्येक लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा

- मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे

- अध्यादेश वैगरे काहीही कामाचे नाही

- मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते

- मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले, जगभरातील मीडियाने दखल घेतली

- खासदार उदयनराजे समन्वय समितीसोबत चर्चा करणार

- कायदा सुव्यवस्था हातात न घेण्याचं आवाहन

- आरक्षण न देण्यामागे इच्छाशक्ती, राजकारण कारण

- कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का नाही?

- इतकी वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित का ठेवला? 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा