शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात, आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 12:42 IST

Maratha Reservation: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशिधान व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे सुरुवात झाली आहे.

पुणे - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशिधान व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे सुरुवात झाली आहे. शुक्रवार (3 ऑगस्ट) आणि शनिवार (4 ऑगस्ट) दोन दिवस आयोगाची बैठक होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या बैठकीला समितीचे सदस्य सर्जेराव निमसे, दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, भूषण कर्डिले, तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख तसेच आयोगाचे अधिकारी उपस्थित आहेत. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात झाली.

या बैठकीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि पुढील तीन या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे  सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे. यावेळी बार्टीच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल)

सर्वेक्षणाचे काम पूर्णमराठा आरक्षणासंदर्भात जाहीर जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यात मराठा समाजातील सामाजिक संस्था, सामूहिक संघटना, ग्रामपंचायत आणि वैयक्तिकरीत्यादेखील निवेदने देण्यात आली. तब्बल 26 हजार अर्ज मागासवर्गीय आयोगाकडे प्राप्त झाले आहेत.तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आवश्यक असलेली माहिती प्राप्त व्हावी यासाठी सहा विभागांत सहा संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. आयोगातर्फे या संस्थांना आरक्षणासंदर्भातील प्रश्न देण्यात आले होते. आयोगाने दिलेल्या प्रश्नानुसार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर