शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:12 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

ठळक मुद्दे देशात सुखसमृद्धी नांदावी, याकरिता मराठा लाईट इन्फंट्री सदैव सज्ज : कर्नल अमन मोहनआमच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो : मराठा लाईट इन्फंट्री

पुणे : भारतात अडीचशे वर्षे पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंटमधील अत्यंत मानाच्या असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी सहकुटुंब दगडूशेठ गणपतीचरणी साकडे घातले. आमच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो आणि आपली रेजिमेंट उत्तरोत्तर प्रगती करो, अशी प्रार्थना गणरायाचरणी करीत बाप्पाची आरतीदेखील जवानांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषासोबतच भारत माता की जय... च्या घोषणांनी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी रेजिमेंटचे कर्नल अमन मोहन, मेजर रोहन खिस्ती, लेफ्टनंट कर्नल जयकुमार मुदलियार, रक्षित देशपांडे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने आदी उपस्थित होते. कर्नल अमन मोहन म्हणाले, सैन्यदलातील मानाच्या असलेल्या आमच्या रेजिमेंटमधील प्रत्येक जवानाची प्रगती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशात सुखसमृद्धी नांदावी, याकरिता मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान देशरक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. देशसेवेच्या कार्याकरिता गणपती बाप्पाने आम्हाला बुद्धी आणि शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली. 

टॅग्स :Dagdusheth Templeदगडूशेठ मंदिरPuneपुणे