शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचा बैलगाडी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 01:59 IST

आंदोलनाचा ४०वा दिवस; दिवे गावाने नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

सासवड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सासवड येथील शिवतीर्थावर बेमुदत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाचा आज ४०वा दिवस होता. या वेळी दिवे पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी आंदोलनस्थळापर्यंत बैलगाड्यांची मिरवणूक काढली.पुरंदरच्या ग्रामीण भागात मराठा बांधव आजही प्रामुख्याने शेती करतो. मात्र, शेतीमालाला बाजारभाव नाही. शैक्षणिक बाबतीत आघाडीवर असूनदेखील आरक्षण नसल्याने अनेक ठिकाणी नोकरीची हुकलेली संधी; त्यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. दिवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बैलगाडीतून येऊन मराठा शेतकऱ्यांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला.बैलगाड्यांसह पदयात्रा काढल्याने ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी सुमारे एका तासाहून अधिक वेळ वाहतूककोंडी झाली होती. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या, ‘राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या तसेच एक मराठा-लाख मराठा’ आदी घोषणांनी शिवतीर्थाचा परिसर दणाणून गेला होता. तहसील कार्यालयावरील ९ आॅगस्टच्या मोर्चानंतर सासवडच्या या ठिय्या आंदोलनाचा सोमवारी ४०वा दिवस होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हे ठिय्या आंदोलन येथे सुरू आहे.आंदोलनस्थळी दिवसभर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन सुरू आहे. उद्या, मंगळवारी (दि. १८) आंदोलनाच्या ४१व्या दिवशी राजुरी गावातील मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा