शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल ७०३ मालकांची नावनोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:07 IST

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे

मंचर : राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे १ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी तब्बल 703 बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली आहे. नियम व अटीचे पालन करत ही शर्यत पार पडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर लांडेवडी ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली असून एक जानेवारीला ही शर्यत लांडेवाडी येथील घाटात पार पडणार आहे. त्यासाठी लांडेवाडी गावात बैलगाड्या मालकांची नाव नोंदणी पार पडली. नाव नोंदणीसाठी बैलगाडा मालकांची झुंबड उडाली होती. 

लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढण्यात आले. या शर्यतीसाठी तब्बल ७०३ बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे नियम व अटीचे पालन करत तसेच कोरोना नियमांचे पालन करत ही शर्यत पार पडणार आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन नियम सांगितले आहेत. दरम्यान लांडेवाडी येथील श्री शितलादेवी यात्रा उत्सव निमित्त विजेत्या बैलगाडा मालकांना  भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहे. सव्वा दोन लाख रुपये रोख, टीव्ही, फ्रिज, मोटर सायकल, सोन्याची अंगठी, बैलगाडा अशी अनेक बक्षिसे विजेत्या बैलगाडा मालकांना दिली जाणार आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावSocialसामाजिकGovernmentसरकारCourtन्यायालय