शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:31 IST

गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ  संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत ३० हजार ८०६ मूर्त्या तर पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ९२४ मूर्त्या टाक्यांमध्ये विसर्जित गेल्या तीन वर्षांपासून शहरात निर्माल्यपासून खत निर्मिती

पुणे : गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ  संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. यापासून संस्थेच्या वतीने खत निर्मिती करण्यात येणार आहे. तर यामध्ये गोळा झालेला २४ टन पेक्षा अधिक सुका कचरा पुनर्निर्माण व प्रक्रियेसाठी पाठविणार आहे.पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्यासाठी विसर्जन घाटावर स्वतंत्र व्यवस्था केली. याशिवाय जास्तीत जास्त नागरिकांना गणेश मूर्त्यांचे महापालिकेच्या विसर्जन हौद व टाक्यांमध्ये विसर्जन करण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे महापालिका हद्दीत ३० हजार ८०६ मूर्त्या तर पिंपरी-चिंचवड हद्दीत २ हजार ९२४ मूर्त्या टाक्यांमध्ये विसर्जित करून घेण्यात आल्या. यासाठी स्वच्छ संस्थेचे ६० कर्मचारी आणि १५० हून अधिक स्वयंसेवक या मोहिमेमध्ये सहभागी झाले. गेल्या काही वर्षांत नदी, तलाठ, कॅनोल ऐवजी विसर्जन हौद, टाक्यांमध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले आहे. निर्माल्य देखील नदीत न टाकता नागरिकांकडून निर्मल कलश, पालिकेचे कर्मचारी, स्वसंसेवक, स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडे देण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरात निर्माल्यपासून तयार करण्यात येणाऱ्या खताचे गोविज्ञान संस्थेच्या मदतीने जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते.      

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८