शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! YCM रुग्णालयात मंत्राने रुग्णावर उपचार; सुरक्षारक्षक नावालाच, अंधश्रद्धेला खतपाणी

By प्रकाश गायकर | Updated: August 18, 2023 15:46 IST

पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्येच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे...

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. असे असताना शहरातील महापालिका रुग्णालयामध्ये तंत्र-मंत्राने रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.१८) सकाळी समोर आला आहे. सुरक्षारक्षक, पोलिस तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ असतानाही खुलेआम रुग्णालयात जादूटोणा व मंत्रोच्चार करत एक व्यक्ती रुग्णावर उपचार करत असल्याचे भासवत होता. यामुळे पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या शहरामध्येच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संत तुकारामनगर येथे महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आहे. साडेसातशे बेडच्या या रुग्णालयामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्णांची गर्दी असते. पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू आहे. तसेच पुरोगामी शहर व विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराचे जुळे शहर म्हणून शहराची ओळख आहे. असे असताना पालिका रुग्णालयामध्ये खुलेआम तंत्र-मंत्राद्वारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या माध्यमातून अनेक गोर-गरीब रुग्णांना लुबाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रुग्णालयामध्ये एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवत एक व्यक्ती मंत्र उच्चारत असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयामध्ये सुरक्षारक्षक, डॉक्टर व कर्मचारी असताना या चुकीच्या प्रकाराला रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात व स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील रुग्णालयात अशा पद्धतीने अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अंधश्रध्देला खतपाणी घालण्यात येत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना देखील या कायद्याला न जुमानता शासकीय रुग्णालयात अंधश्रद्धा पसरवण्याचे व गरीब रुग्णांना लुटण्याचे काम खुलेआम चालू आहे. याची सखोल चौकशी करून या व्यक्तीवर व त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत कारवाई करावी. - संतोष शिंदे, प्रदेश महासचिव, रयत विद्यार्थी विचार मंच

 

रुग्णालयामध्ये येणारी व्यक्ती ओपीडीसाठी येत आहे की तंत्रमंत्र करण्यासाठी येत आहे, हे ओळखणे अवघड आहे. मात्र, सीसीटीव्ही तपासून संबंधित व्यक्तीवर कारवाईसाठी प्रयत्न करू. तसेच सुरक्षारक्षकांना यापुढे अलर्ट राहण्याच्या सूचना देतो. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड