नम्रता फडणीस पुणे : कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर चित्रकृती चितारणारा मानसीचा चित्रकार..कला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा दयावती मोदी पुरस्कार प्राप्त झालेला एकमेव कलाकार...'शिखरे रंग-रेषांची' या पुस्तकाद्वारे चित्रकलेविषयी प्रकट चिंतन करणारा लेखक...समाजामध्ये चित्रसाक्षरता प्रस्थापित व्हावी यासाठी झटणारा हाडाचा शिक्षक अशा विविध प्रतिमांमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे आता ‘ब्रश मायलेज’ या माहितीपटाद्वारे रसिकांच्या भेटीस येत आहेत. अॅनिमेशन फिल्ममेकर दत्तप्रसाद मेटे यांनी चित्रकार रवी परांजपे यांच्यावर माहितीपट निर्मितीचे शिवधनुष्य पेलत ही चित्रमूर्ती घडविली आहे. शालेय स्तरावर कला विषय दुय्यम समजला जात असताना रवी परांजपे यांच्यासारखा एक चित्रकार पन्नास वर्षांपासून कलेचे महत्व, कलेचे जीवनातील स्थान,अभिजाततेला सर्जनशीलतेचे लाभलेले कोंदण, कलेतून होणारी राष्ट्राची प्रगती अशा अनेक पैलूंमधून रसिकांमध्ये चित्रसाक्षरता निर्माण करण्यासाठी झटत आहे. कलेकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी देणारा त्यांचा आश्वासक प्रवास विचार करायला लावणारा आहे.महाराष्ट्रातील एखाद्या चिंतनशील चित्रकाराच्या कलात्मक जडणघडणीवर अशा प्रकारचा माहितीपट साकार होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.
‘मानसीचा चित्रकार’ माहितीपटाद्वारे रसिकांसमोर येणार....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:35 IST
महाराष्ट्रातील एखाद्या चिंतनशील चित्रकाराच्या कलात्मक जडणघडणीवर अशा प्रकारचा माहितीपट साकार होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.
‘मानसीचा चित्रकार’ माहितीपटाद्वारे रसिकांसमोर येणार....
ठळक मुद्दे‘ब्रश मायलेज’ हा माहितीपट 56 मिनिटांचाया माहितीपटात परांजपे यांची चित्रे,आयुष्यात आलेले चढउतार,बालपण असा प्रवास