शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोहर अंबानगरी’ची लघुपट महोत्सवात बाजी; आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:20 IST

अंबाजोगाई परिसरातील विविध ऐतिहासिक मंदिरे, निसर्ग सौंदर्य व लेण्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख पुण्यातील राहुल नरवणे या तरुणाने लघुपटातून उलगडली आहे.

ठळक मुद्देकंबोडिया येथे होणाऱ्या ‘एशिया साऊथ ईस्ट फिल्म फेस्टिव्हल’चा ‘आॅनरेबल अ‍ॅवॉर्ड’ जाहीरगेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे ‘मनोहर अंबानगरी’ प्रकल्प

पुणे : अंबाजोगाई परिसरातील विविध ऐतिहासिक मंदिरे, निसर्ग सौंदर्य व लेण्यांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख पुण्यातील राहुल नरवणे या तरुणाने लघुपटातून उलगडली आहे. त्याच्या ‘मनोहर अंबानगरी’ या लघुपटाला या वर्षीच्या कंबोडिया येथे होणाऱ्या ‘एशिया साऊथ ईस्ट फिल्म फेस्टिव्हल’चा ‘आॅनरेबल अ‍ॅवॉर्ड’ जाहीर झाला आहे. ‘द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’नेही या लघुपटाची दखल घेतली आहे.गेल्या तीन वर्षांपासून ‘मनोहर अंबानगरी’ हा प्रकल्प सुरू आहे. हा लघुपट ‘इको फिल्म फेस्टिव्हल ब्रिक्स’च्या माध्यमातून मॉस्को, रशिया येथे दाखवण्यात आला. संस्कृती, इतिहास आणि पुरातत्त्वकदृष्ट्या अंबाजोगाईचे महत्त्व प्रचंड आहे. त्याच अंबाजोगाईची दखल आता लघुपटातून ‘द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ने घेतली आहे. याच महोत्सवामध्ये राहुल नरवणे याने केलेला ‘केदारेश्वर टेम्पल’ हा लघुपटही दाखवण्यात येणार आहे. उजनी (ता. अंबाजोगाई) येथील राहुल नरवणे यांनी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतीय विद्याशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. ‘मनोहर अंबानगरी’मध्ये अंबाजोगाईचे पंचमवेद अकादमीचे विनोद निकम, नृत्य कलावंत, नामदेव गुंडाळे यांनीही काम केले आहे. लघुपटाच्या टीममध्ये विश्वास कुलकर्णी, दत्ता अंकुशे, स्वप्निल जोशी, राहुल पोतदार याचा समावेश आहे.  ‘मनोहर अंबानगरी’ आता अमेरिकेत दाखवण्यात येईल. ‘द आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मधील कला, संस्कृती आणि इतिहास या विभागात ४५ देशांमधील ८०० फिल्ममधून ३० लघुपट दाखवण्यात येतील. ओरेगन राज्यातील युजीन शहरात  महोत्सव २ ते ६ मे या कालावधीत होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे