शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मानकरांनी मालमत्तेची दिली खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:37 IST

कंपन्यांची होणार चौकशी : विधानसभा व पालिकेच्या निवडणुकीत मालमत्तेचे विवरण सादर

पुणे : कसबा पेठ विधानसभा आणि महानगरपालिकेच्या सभासदासाठी निवडणूक लढवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी स्वत:च्या व नातेवाइकांच्या मालमत्तेसंदर्भात दिलेल्या विवरणपत्रात व तपासून समोर आलेल्या मालमत्तेत तफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विवरणपत्रातील आणि तपासातील मालमत्तेत तफावत आढळल्याने मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात आणि जिल्ह्यात त्यांच्या इतर मालमत्तेबाबतदेखील कसून चौकशी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणात मानकर आरोपी असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात झडती घेतली असता त्यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे ुुप्राप्त झाली आहेत. त्यामुळे विवरणपत्र व जप्त केलेल्या कागदपत्रांबाबत चौकशी करण्यासाठी मानकर यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार वकील विलास पठारे यांनीकेली. त्यानुसार विशेष न्यायाधीशए. एस. महात्मे यांनी मानकर यांना२६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.४१८ रास्ता पेठ येथील मिळकतीचा विक्रीचा व्यवहार पोरवाल बिल्डर्स यांच्याबरोबर झाला होता. त्या वेळी जगताप यांना टाळून थेट मानकर यांच्याशी व्यवहार करा व ७ कोटी रुपये द्या, असे सांगण्यात आल्याचे साक्षीदाराने सांगितले आहे.या गुन्ह्यातील आरोपी व त्यांच्या नातेवाइकांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स, बँक स्टेटमेंट, शेअर्सबाबतची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून, त्याचे फॉरेन्सिक आॅडिट करण्यासाठी सीएची नेमणूक करण्यात आली आहे. तपासणीसाठी देण्यात आले आहे. मानकर यांची पुणे जिल्ह्याबाहेर स्थावर व जंगम मालमत्ता असून त्याचे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत.हे व्यवहार करीत असताना त्यांचा हस्तक कोण होता. मानकर व त्यांच्या नातेवाइकांच्या नावाने विविध ठिकाणी कंपन्या असून काही कंपन्यांमध्ये ते स्वत: संचालक आहेत. २००९ ते २०१८ पर्यंत त्यांनी भरलेल्या आयटी रिटर्न्स व तपासामध्ये प्राप्त झालेल्या मालमत्तेसंदर्भात तफावत दिसत आहे. या सर्वांचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. पठारे यांनी केली.दीपक मानकर यांच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा आणि अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवाद केला. मानकर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :Puneपुणे