शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात मंजुळेंच्या चित्रपटाचा सेट जैसे थे : प्रशासनाची केली दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 21:34 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांना डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांच्या चित्रपटाचे शुटींग झालेच नाही.

ठळक मुद्देसेट काढण्याचा दिखावा करून त्याने प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप कुलगुरू जबाबदारी स्वीकारून कारवाईला सामोरे जाणार का, व्यवस्थापन परिषदेचा जाब

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या ७ महिन्यांपासून चित्रपटाचा सेट लावला आहे. याप्रकरणी कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर आपण सेट काढून घेत असल्याचे पत्र ३ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुळेकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिड महिना उलटला तरी चित्रपटाचा सेट मैदानावर जैसे थे स्थितीत आहे. चित्रपटाचा सेट काढून घेत असल्याचे सांगून त्याच्याकडून प्रशासन व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांना डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांच्या चित्रपटाचे शुटींग झालेच नाही. त्याचबरोबर हे मैदान मैदान भाडयाने देताना उच्च शिक्षण विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांची परवानगी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. यापार्श्वभुमीवर नागराज मंजुळे यांना नोटीस बजावून ७ दिवसांच्या आत सेट काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिड महिना उलटलला तरी त्यांनी सेट काढून घेण्याची काहीच कार्यवाही केली नव्हती. मंजुळे यांनी ‘‘माझ्या हिंदी फिल्मचं शूटिंग काही तांत्रिक अडचणींमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा असलेला सेट काढण्याचे काम सुरु झाले आहे. विद्यापीठाने केलेल्या सहकार्याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत ऋणी राहीन.’’ अशी पोस्ट फेसबुक टाकून चित्रपटाचा सेट काढत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र केवळ सेट काढण्याचा दिखावा करून त्याने प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.कुलगुरू आता तरी कारवाईला सामोरे जाणार का?नागराज मंजुळे यांच्यासोबत बेकायदेशीरपणे करार करून विद्यापीठाने मैदान भाडयाने दिले. या बेकायदेशीर कराराची मुदत संपल्यानंतरही त्यांनी चित्रपटाचा सेट काढलेला नाही. याप्रकरणी मंजुळेंवर नियमानुसार मोठी दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मंजुळे यांना मैदान भाडयाने देण्याचा निर्णय सर्वस्वी आपला होता असे स्पष्टीकरण कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी यापुर्वीच दिले आहे. त्यामुळे कुलगुरू ही जबाबदारी स्वीकारून स्वत: कारवाईला सामोरे जाणार का, व्यवस्थापन परिषद त्यांना याबाबत जाब विचारणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खेळाडूंची ससेहोलपटसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण मैदान आहे. या मैदानातील निम्म्या भागात दुरूस्तीचे काम चालू आहे. उर्वरित भागात दररोज शेकडो खेळाडू विविध खेळांची तयारी करीत. या भागात गेल्या ७ महिन्यांपासून नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. ४५ दिवसात हा सेट काढला जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अद्यापही सेट हलविला जात नसल्याने त्या खेळाडूंची मोठयाप्रमाणात ससेहोलपट होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर