शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मांजरी रेल्वेगेटवर वारंवार वाहतूककोंडी; फाटक तुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:41 IST

मांजरी बुद्रुक रेल्वे फाटक क्रमांक तीनमध्ये वारंवार बिघाड होण्याची तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी गेट बंद राहिल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

ठळक मुद्देनवीन बसविण्यात आलेल्या रेल्वे फाटकामध्ये वारंवार बिघाडएक किलोमीटर अंतरावर गेल्या होत्या रेल्वेगेटवर झालेल्या वाहतूककोंडीच्या रांगा

मांजरी : मांजरी बुद्रुक रेल्वे फाटक क्रमांक तीनमध्ये वारंवार बिघाड होण्याची तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकारे गेट बंद राहिल्याने संध्याकाळच्या वेळी तसेच बुधवारी प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.मांजरी बुद्रुक-वाघोली रस्त्यावर मांजरी बुद्रुक येथे रेल्वे गेट क्रमांक तीन आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. त्यातच नवीन बसविण्यात आलेल्या रेल्वे फाटकामध्ये वारंवार बिघाड होत आहेत. याशिवाय अवजड वाहने धडकून गेट तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी असेच गेट तुटल्याने वाहतूककोंडीचा सामना कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार, शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थी आणि इतर सर्व वाहन चालक यांना करावा लागला. येथे काही तास त्यांना अडकून पडावे लागले. रेल्वेगेटवर झालेल्या वाहतूककोंडीच्या रांगा एक किलोमीटर अंतरावर गेल्या होत्या. काही मिनिटांसाठी गेट उघडल्यानंतर रेल्वे रुळावरच मोठी गर्दी झाली होती. त्यात येणाऱ्या रेल्वेच्या आवाजाने नागरिक चांगलेच घाबरून गेले होते.

दररोजच्या रेल्वेच्या वाढलेल्या संख्येमुळे गेट बंद राहिल्याने ही वाहतूक मंदावत आहे. त्यामुळे रेल्वे फाटकाची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी. येथे वाहतूक पोलीस नेमावेत तसेच फाटकाच्या दोन्ही बाजूला दुभाजक घालावेत, अशी मागणी यावेळी कोंडीत अडकलेले नागरिक करीत आहेत.

टॅग्स :ManjriमांजरीPuneपुणे