पुणे : धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील ड्रेनेजमुळे बुधवारी झालेल्या अपघातानंतर आता शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकणे तपासण्याचे व रस्त्याच्या वर आलेली झाकणे त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.रस्त्याच्या उंचीपेक्षा वर आलेल्या ड्रेनेजच्या कामामुळे अपघात होऊन तीन हत्ती चौकात बुधवारी एका युवकाचा मुृत्यू झाला. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेने पालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यामुळे आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश ड्रेनेज विभाग व पथ विभागाला दिला. पावसामुळे रस्ता खचला व ड्रेनेज वर आले, असा अहवाल त्यावर ड्रेनेज विभागाने दिला. तर, पथ विभागाने आपल्याला अहवाल देण्याचा आदेशच नाही, अशी भूमिका घेतली. याबाबत आयुक्तांना विचारले असता त्यांनी अपघाताला ड्रेनेजचे कामच कारणीभूत ठरले, असे स्पष्ट होत नसल्याचे सांगितले.
पालिका तपासणार ‘मॅनहोल’
By admin | Updated: November 28, 2015 00:54 IST