शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमध्ये १४०० रुपयांना आंब्याची पेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:13 IST

बाजारात आंब्याचा सुगंध दरवळला की उन्हाळ्याची चाहूल तीव्रतेने जाणवते. वाढत्या असह्य झालेल्या उन्हाच्या झळा अस्वस्थ करतात. याच वेळी बाजारात दरवळणारा आंब्याचा सुगंध सुखावून टाकतो. बारामती शहरातदेखील गेल्या काही दिवसांपासून अांब्याचा सुगंध दरवळू लागला आहे. मात्र, हा सुगंध अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. शहरातील बाजारात १४०० रुपयांना दोन डझन किमतीची आंब्याची पेटी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

बारामती - बाजारात आंब्याचा सुगंध दरवळला की उन्हाळ्याची चाहूल तीव्रतेने जाणवते. वाढत्या असह्य झालेल्या उन्हाच्या झळा अस्वस्थ करतात. याच वेळी बाजारात दरवळणारा आंब्याचा सुगंध सुखावून टाकतो. बारामती शहरातदेखील गेल्या काही दिवसांपासून अांब्याचा सुगंध दरवळू लागला आहे. मात्र, हा सुगंध अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. शहरातील बाजारात १४०० रुपयांना दोन डझन किमतीची आंब्याची पेटी विक्रीसाठी उपलब्ध आहे.शहरात सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी चौकात आंब्याची पेटी घेऊन बसलेले परप्रांतीय विक्रेते बारामतीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या पेट्यांमध्ये पिवळेधमक आंब्याच्या दराची चौकशी करण्याचा मोह सर्वांनाच होत असल्याचे चित्र आहे. मात्र, चौकशी केल्यानंतर आंब्याचे दर ऐकून सर्वांचा भ्रमनिरास होतो. १२०० ते १४०० रुपये आंब्याच्या पेटीचा दर सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी असलेल्या आंब्याला महाग दरामुळे ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बारामती शहरात रत्नागिरी हापूस, पायरी, तोतापुरी, कलमी आंबा, गावठी आंब्याला विशेष मागणी असते. अक्षयतृतीयेपर्यंत आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात.बारामतीमध्ये विक्रीसाठी असणाºया आंब्याला नैसर्गिक सुगंध नाही. हा आंबा कृत्रिम पद्धतीने पिकविला गेलेला नाही. गवतामध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकविल्याचा दावा येथील परप्रांतीय आंबाविक्रेत्याने केला आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या आंब्याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे. कृत्रिम पद्धतीने हानिकारक रसायनांचा वापर करुन पिकविलेल्या आंब्याची विक्री करणारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणे