शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Pune | थकीत बिलामुळे मंचर उपजिल्हा रुग्णालय अंधरात; सेवा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:32 IST

यासंदर्भात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न तातडीने उपस्थित केला...

मंचर (पुणे) : विजबिल थकल्याने मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा महावितरणने दुपारी खंडित केला होता. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेणारे रुग्ण, नवजात शिशु व डायलिसिस होणाऱ्या रुग्णांना धोका निर्माण झाला होता. जनरेटर सुरू करून कसेबसे उपचार केले जात होते. यासंदर्भात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न तातडीने उपस्थित केला. त्यानंतर दीड तासात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे सुमारे ५२ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. यासंदर्भात महावितरणने पत्रव्यवहार केला होता. मार्चअखेर विजबिल भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मंचर उपजिल्हा रुग्णालयात आंबेगाव तालुक्याबरोबरच इतर तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मंगळवारीही रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण व नातेवाईकांची गर्दी झाली होती. सकाळी बारा वाजून पन्नास मिनिटांनी महावितरणचे अधिकारी आले. त्यांनी विजबिल लवकर भरा असे सांगत उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केला. त्यावेळी अतिदक्षता विभागात चार रुग्ण उपचार घेत होते. तर तीन नवजात शिशु काचेमध्ये ठेवण्यात आले होते. सहा रुग्णांवर डायलिसिस केले जात होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने या रुग्णांना धोका निर्माण झाला. शिवाय इतर अनेक रुग्ण उपचार घेत होते. त्यांची गैरसोय झाली.

शस्त्रक्रिया थांबल्या गेल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार भवारी व इतर कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करू नका रुग्णांच्या जीवाला धोका होईल अशी विनंती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काहीही न ऐकता ते निघून गेले. यादरम्यान रुग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय कर्मचारी आक्रमक झाले.

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक ॲड. अविनाश राहणे, संतोष गावडे, सुरेश आण्णा निघोट, सुरेखा निघोट, सुवर्णा डोंगरे, कमरअली मणियार, राजू सोमवंशी, विजय जाधव, महेश घोडके आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तेथे आले. यावेळी महावितरणच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना येथे आणून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आग्रह धरला. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता जयंत गेटमे यांच्याशी संपर्क साधला.सुरुवातीला गेटमे येण्यासाठी तयार नव्हते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना उपजिल्हा रुग्णात आणले.

त्यावेळी झालेल्या चर्चेत निधी आल्यानंतर 31 मार्चच्या आत वीजबिल भरले जाईल असे डॉ. भवारी यांनी सांगितले. यादरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. मंचर उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये शंभरपेक्षा जास्त क्रिटिकल पेशंट आहेत. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक तासांपासून तेथील वीजपुरवठा खंडित केला आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. व्हेंटिलेटर, डायलिसिस चालू असताना वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण वीज पुरवठा जोडणार का व वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करणार का असा प्रश्न वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॉईंट ऑफ ऑर्डरमध्ये केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी तात्काळ वीज पुरवठा सुरू करू यात कुणी जाणीवपूर्वक चूक केली असेल तर कारवाई करू असे उत्तर दिले. त्यानंतर महावितरणने मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा पूर्ववत केला. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी यावेळी अविनाश राहणे यांनी केली. तर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या महावितरण कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार यांनी केली.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयात अंधार झाला.रुग्णांचे नातेवाईक हवालदील झाले.त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.एक दिवसाचे बाळ काचेमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी जनरेटर बंद झाल्यावर काय होणार असा प्रश्न केला.विशेष म्हणजे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वतः डिझेल आणून हे जनरेटर सुरू ठेवले होते.सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.वैद्यकीय अधिकारी संतप्त झाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत महावितरण कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.नातेवाईकांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नमते घेतले.

आज मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वीजपुरवठा वीजबिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता. यामुळे आयसीयू , डायलिसिस विभाग, ऑपरेशन थिएटर, प्रसूती विभाग व हॉस्पिटलमधील इतर विभाग व त्यातील रुग्ण यांचे उपचार ठप्प झाले होते. याची तातडीने कल्पना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली. वळसे पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत केला असून वीजबिल भरण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या .

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड