शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

वसंतोत्सवात रंगणार ‘मानापमान’!

By admin | Updated: January 11, 2017 03:36 IST

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासह, नाट्यसंगीत, फ्यूजन आदी संगीत प्रकारांनी सजलेला वसंतोत्सव यंदा २० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार आहे.

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासह, नाट्यसंगीत, फ्यूजन आदी संगीत प्रकारांनी सजलेला वसंतोत्सव यंदा २० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. कृष्णाजी खाडिलकर लिखित प्रसिद्ध संगीत नाटक ‘मानापमान’ हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण असून, बालगंधर्वांनी अजरामर केलेल्या या कलाकृतीचे सुश्राव्य सादरीकरण गायक राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे करतील. रसिकांप्रती कृतज्ञता म्हणून याही वर्षी वसंतोत्सव विनामूल्य असणार असल्याची घोषणा शास्त्रीय गायक व डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. न्यू इंग्लीश स्कूल रमणबाग येथे सायंकाळी ५.४५ ते १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे. पत्रकार परिषदेला विशाल गोखले, पूनम गोखले आणि मिलिंद मराठे  उपस्थित होते.वसंतोत्सवाचे उद्घाटन दि. २० रोजी ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल. त्यानंतर कृष्णाजी खाडिलकर लिखित प्रसिद्ध संगीत नाटक ‘मानापमान’चे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवसाची (दि. २१) सुरुवात सिनेगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनाने होईल. आपल्या वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करत दुसऱ्या दिवसाचा समारोप प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि राहुल देशपांडे यांच्या एकत्रित सादरीकरणाने होईल. तिसऱ्या दिवसाची सुरुवात आनंदगंधर्व म्हणून परिचित असलेले किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. महोत्सवाचा समारोप इंडियन ओशन या प्रख्यात रॉक बँडचे गायन व वादक पं. विश्व मोहन भट यांच्या फ्युजनने होईल.याही वर्षी ‘वसंतोत्सव विमर्श’ या एकदिवसीय संगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १९ रोजी घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत होणाऱ्या पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १ या वेळेत प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर रियाजाच्या विविध पद्धती आणि त्यांचे महत्त्व उपस्थितांना उलगडून सांगतील. दुपारी २ ते ४ या वेळेत दुसऱ्या सत्रात ते राग खुलवण्याच्या काही प्रकारांबद्दल रसिकांना मार्गदर्शन करतील. (प्रतिनिधी)सुलभा ठकार, राजीव परांजपे यांना पुरस्कार४ज्येष्ठ गायिका सुलभा ठकार व आॅर्गनवादक राजीव परांजपे यांना यंदाचा ‘डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान’ प्रदान केला जाणार आहे. ‘डॉ. वसंतराव देशपांडे उदयोन्मुख कलाकार पुरस्कार’ युवा गायक श्रीपाद लिंबेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण होईल.