शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

....तुमची केस मॅनेज करून देते! 50 लाखांच्या लाच प्रकरणात महिला न्यायाधीशांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 17:14 IST

महिला न्यायाधीशाने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला.

पुणे : न्यायाधीशाला मॅनेज करुन तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केली. 

अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक केली आहे़ तर, लाच घेताना जानेवारीमध्ये खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) हिला लाच लुचपत प्रबिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चना जतकर यांना अटक करण्यात आली आहे. 

अर्चना जतकर - शुभावरी गायकवाड यांच्यात तब्बल १४७ वेळा संपर्क करुन संभाषण केले आहे. गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करुन देते असे म्हणाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे सभाषण व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी ७ ते ८ जणांना जागेच्या वादासंदर्भात कोर्टातून निकाल लावून देते असे म्हणून संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या कोर्टामध्येच सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

न्यायाधीश जतकर यांनी आरोपीसोबत संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीमकार्ड हे मुंबईतील समता कुबडे यांच्या नावावर आहे. त्यांनी जतकर यांना दोन सीमकार्ड दिले आहेत. दुसरे सीमकार्ड जतकर यांनी कोणाला दिले याचा तपास करायचा आहे. जतकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी भानुदास जाधव याला एकूण १८ कॉल केले असून सुशांत केंजळे याला ४ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. जतकर व इतर आरोपी यांनी यापूर्वी कट रचून आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास करायचे असल्याचे सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ६ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सहायक पोलीस आयुक्त सिमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत.

अर्चना जतकर यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार अर्चना जतकर या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी शरण आल्या़ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले.