शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा हटवायला गेले आणि सोनसाखळी गमावून बसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:49 IST

चांगल्या हेतूने केलेली मदत महागात पडल्याचे उदाहरण पुण्यात बघायला मिळाले आहे. समोर अपघात झाल्यामुळे रस्त्यावर आलेली रिक्षा हटवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी चोराने लंपास केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पुणे : चांगल्या हेतूने केलेली मदत महागात पडल्याचे उदाहरण पुण्यात बघायला मिळाले आहे. समोर अपघात झाल्यामुळे रस्त्यावर आलेली रिक्षा हटवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी चोराने लंपास केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या संदर्भात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिंक्य माने (वय ३२, रा. गोकुळनगर, कोंढवा ) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

   अधिक माहिती अशी की, शनिवार (दि.३०) रोजी फिर्यादी त्यांची पत्नी व मुलीसह कारमधून जात होते. त्यावेळी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान कात्रज- कोंढवा बुद्रुक रस्त्यावरील गोकुळनगर येथील तीन नंबरच्या लेनमधून जात असताना समोर दुचाकी व रिक्षाचा अपघात झाला. त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे कार पुढे जाणेही शक्य नव्हते. अशावेळी समोरील रिक्षा हटवण्यासाठी फिर्यादी बाहेर पडले. तिथे रिक्षा बाजूला करत असताना गर्दीतील एका अनोळखी इसमाने त्यांची ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली. चेन गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीKondhvaकोंढवाkatrajकात्रज