शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण बाजारपेठेत बोलबच्चनचा वर्कशॉप मालकाच्या चाळीस हजारांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:24 IST

भिगवण बाजारपेठेत भरदिवसा बोलण्यात गुंतवत व्हाइटकॉलर बुलेट राजाने वर्कशॉप मालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला.

ठळक मुद्देभिगवण बाजारपेठेत दुपारच्या सुमारास घडली घटनाबुलेटगाडी, खादी कपडे, सोन्याच्या अंगठी घालत सावजाला लुटणाऱ्याला शोधण्याचे आव्हान

भिगवण : भिगवण बाजारपेठेत भरदिवसा बोलण्यात गुंतवत व्हाइटकॉलर बुलेट राजाने वर्कशॉप मालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. बुलेटगाडी आणि खादी कपडे घालून सोन्याच्या अंगठी घालत सावजाला लुटणाऱ्या मुन्नाभाईला शोधण्याचे आव्हान भिगवण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.भिगवण येथे मोटार रिवायडिंग व्यवसाय करणारे व्यावसायिक पंडित विठ्ठल गाडेकर (वय ३४) आपले मावसभाऊ राजकुमार वाघ यांच्याशी मुख्य बाजार पेठेत बोलत थांबले होते. एक मजबूत बांध्याच्या बुलेटस्वाराने त्यांना भिगवण येथे महा-ई सेवा केंद्र कोठे आहे, असा पत्ता विचारला. या वेळी बुलेटवरील पाठीमागे बसलेला इसमाने दारू प्यायल्याचे नाटक करीत पंडित यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पंडित यांनी त्याला पाठीमागे ढकलले असता त्यांच्या पायाशी हात नेत चुकल्याचे सांगून गाडीवर बसून पोबारा केला. याच वेळी पंडित यांना आपल्या खिशातील चाळीस हजार नसल्याचे लक्षात आले. अंगाशी झटत असताना त्या व्यक्तीने पैसे काढल्याची जाणीव होताच गाडेकर यांनी आपल्या मित्रांना याची माहिती देत या चोरट्याचा शोध घेतला. परंतु काही वेळातच या चोरट्यांनी पोबारा केला.

टॅग्स :Puneपुणे