शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

‘मालती-माधव’मध्ये बहरला पुलंचा स्मृतिगंध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:54 IST

साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, चित्रकला, शिल्पकला, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत ’मालती-माधव’ अपार्टमेंट या पुलंच्या निवासस्थानी लाडक्या पुलंचा जन्मदिन सोहळा रंगला.

पुणे - साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, चित्रकला, शिल्पकला, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत ’मालती-माधव’ अपार्टमेंट या पुलंच्या निवासस्थानी लाडक्या पुलंचा जन्मदिन सोहळा रंगला. संपूर्ण आसमंत पुलंच्या स्मृतिगंधाने बहरून गेला.महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष गुरुवारपासून (८ नोव्हेंबर) सुरू झाले. त्यानिमित्ताने पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा भाग म्हणून सकाळी पुलंच्या निवासस्थानी गुणिजनांचा मेळा भरला होता. दिवाळीतील पाडव्याचा दिवस असतानाही अनेकांनी आपल्या लाडक्या पुलंच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृती जागविल्या. भांडारकर रस्त्यावरील मालती-माधव अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारापाशी महापालिकेने जन्मशताब्दी वर्षाची माहिती देण्यासाठी उभारलेल्या नीलफलकाचे अनावरण महापौर मुक्ता टिळक, नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी सर्वांचे प्रेमाने स्वागत केले.ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे, संजीव अभ्यंकर, भुवनेश कोमकली, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट, मंगला गोडबोले, रेखा इनामदार-साने, मुकुंद टाकसाळे, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संचालक रवींद्र वंजारवडकर, सांस्कृतिक संचालनालयाचे मिलिंद लेले, अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर, प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, अभिनेता अजय पूरकर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या वेळी उपस्थित होते.निखळ आनंदाने आणि माणुसकीने जीवनाकडे कसे पाहावे, हे शिकविणाऱ्या पुलंचे माझ्यासह अनेकांवर अनंत उपकार आहेत, अशी भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केली. ’तुझे आहे तुजपाशी’, ‘एक झुंज वाºयाशी’ या पुलंनी लिहिलेल्या नाटकांतून आणि ‘एक होता विदूषक’ चित्रपटामध्ये मी काम केले. ‘तुझे आहे तुजपाशी’च्या तालमींना ते हजर असायचे, असे त्यांनी सांगितले. मुक्तांगण संस्थेतील मुलांनी पुलंच्या निवासस्थानी आकाशकंदील लावून जन्मशताब्दीचे आणि दिवाळीचे स्वागत केले.

टॅग्स :Puneपुणे