शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पुणे- मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारल्याचं प्रकरण; सार्वजनिक स्तरावरच माफी मागण्याची सोनाली दळवीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 20:20 IST

तृतीयपंथी म्हणून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारल्यावर उच्चंशिक्षित तृतीयपंथी सोनाली दळवी यांनी मॉल प्रशासनाने सार्वजनिक अपमान केला असून सार्वजनिक स्तरावरच माफी मागावी अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देपुण्यात तृतीयपंथीय व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला व्हीडिओ व्हायरल :समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त 

पुणे :

फिनिक्स मॉल प्रशासनाने माझाच नव्हे तर माझ्या जात बांधवांचा अपमान केला आहे.सर्वत्र आमच्याबद्दल चर्चा सुरु झाली असून त्यांनी सार्वजनिक स्तरावर आणलेल्या या मुद्द्यावर आता सार्वजनिक स्तरावरच माफी मागायला हवी असे मत सोनाली दळवी यांनी व्यक्त केले.तृतीयपंथी आहे म्हणून प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये घडली. सोनाली दळवी यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसिद्ध झाला. त्यावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून आम्ही सोनाली यांच्या लढ्यात त्यांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.  सोनाली यांनी लोकमतशी बोलताना मी ही लढाई कायदेशीर मार्गाने लढणार आहे असे सांगितले.  काही तृतीयपंथीयांकडून त्रास झाला, त्यामुळे मला अशी वागणूक दिली असे मॉल प्रशासनाचे म्हणणे असेल तर जेव्हा काही सामान्य स्त्री पुरुष जेव्हा त्रास देतात तेव्हा ते कारण दाखवून इतर स्त्री पुरुषांनाही प्रवेश नाकारला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.   एकीकडे सुरक्षा यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे देशात अतिरेकी हल्ले झाल्याचे उदाहरणे समोर असताना आपलेच बांधव असलेल्या तृतीयपंथीयांना मात्र साध्या मॉलमध्ये प्रवेश नाकारला जातो असे सांगत समाजाच्या सर्व स्तरावरून पुण्यात घडलेल्या घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.  अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही याविषयी लोकमतकडे नाराजी  प्रदर्शित केलं असून संविधानाने भारतीयांना सर्वत्र संचाराचा अधिकार दिला आहे.अशावेळी लैगिकता लक्षात घेवून कोणी त्यांना नाकारणे चुकीचे आहे. आज देशात न्यायाधीशब पदापासून अनेक ठिकाणी तृतीयपंथी महिला काम करत असून त्यांना अधिक वागणूक देणे खेदजनक असल्याचे त्या म्हणाल्या. स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी बोलताना माणसाने माणुसकीचा विचार न करता केलेली ही कृती मानायला हवी असे म्हटले.तृतीयपंथीय व्यक्तीला हे नियम कुणी लावले, का लावले याचा जाब विचारला पाहिजे. त्यांच्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.ती व्यक्ती उच्चशिक्षित असून त्याला प्रदेश नाकारणे अतिशय चुकीचे आहे असेही त्या म्हणाल्या. शिक्षिका गौरी गोसावी यांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. मुळात समाजात तृतीयपंथियांविषयी गैरसमज असून ते पहिल्यांदा दूर करण्याची गरज आहे. त्यांना समाज माणूस म्हणून स्वीकारले तेव्हा हे सर्व प्रकार बंद होतील.

 

 

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरल