शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

लाफ्टरयोगा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षपदी मकरंद टल्लू यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:56 IST

गेल्या तेवीस वर्षांपासून हास्ययोगाचा प्रचार व प्रसार करणा-या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदी हास्ययोगतज्ञ मकरंद टिल्लू यांची निवड झाली.

ठळक मुद्देमकरंद टिल्लू हे एकपात्री कलाकार व मोटीव्हेशनल स्पिकर म्हणून ते  सुपरिचित१००० हून अधिक हास्यक्लब

पुणे : गेल्या तेवीस वर्षांपासून हास्ययोगाचा प्रचार व प्रसार करणा-या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षपदी हास्ययोगतज्ञ मकरंद टिल्लू यांची निवड झाली. डॉ. सुभाष देसाई यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. याशिवाय संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. जयंत मुळे , सेक्रेटरी म्हणून अनुराधा भांडारकर व मुख्य सल्लागार म्हणून विठ्ठल काटे यांची निवड झाली आहे. हास्यक्लबच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणा-या मान्यवरांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. यामध्ये डॉ. सुभाष देसाई ( पुणे ), डॉ. माधव म्हस्के (ठाणे), आत्माराम तोरणे ( मुंबई), डॉ. सुषमा दुगड, आदिती वाघमारे ( नासिक), डॉ. दिलीप शहा ( कोल्हापूर ), भानुदास कोळेकर ( पेठ वडगाव ), माणिकराव हंडरगुळे ( लातूर ), व्ही.पी. मदान (नागपूर), कमल कछुवा ( चंद्रपूर) यांचा समावेश आहे. लाफ्टरयोगा इंटरनॅशनल,महाराष्ट्र  या संस्थेचे डॉ. मदन कटारिया हे संस्थापक असून, शंभरहून जास्त देशात तसेच महाराष्ट्रात पुणे, नाशिक , मुंबई, ठाणे, सातारा , सांगली, कराड, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, नागपूर, चंद्रपूर  अशा अनेक ठिकाणी सुमारे १००० हून अधिक हास्यक्लब आहेत. या राज्यभरातील विविध हास्यक्लबच्या समन्वयाचे काम लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र ही संस्था करते.मकरंद टिल्लू हे एकपात्री कलाकार व मोटीव्हेशनल स्पिकर म्हणून ते  सुपरिचित आहेत. हास्यक्लब, शाळा , कॉलेज, विविध कंपन्या, शासकीय कर्मचारी, पोलीस यांच्यासाठी त्यांनी हास्ययोग प्रशिक्षण कार्यशाळा  घेतल्या आहे.----------------------------------------------------------------------------------------------------------  ‘८० टक्के आजारांचे मूळ ताणतणाव ,काळजी, नैराश्य यामध्ये आहे. हास्याचे व्यायाम केल्यावर शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक बदल घडताना दिसत आहेत. याविषयी शास्त्रीय संशोधन करण्यावर आमचा भर असेल. तसेच  राज्यभर हास्ययोग प्रसार व प्रचाराचे अनेक उपक्रम राबविण्यात  येणार आहेत. शासकीय कर्मचारी, पोलीस दल, वकिल यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याचा आमचा मानस आहे .’ - मकरंद टिल्लू, अध्यक्ष,लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र                      

टॅग्स :Puneपुणे