जवानांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:11 AM2020-12-25T04:11:29+5:302020-12-25T04:11:29+5:30

हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांच्याकडून स्वतंत्र प्रतिक्षालयासाठी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. पण त्यावर अद्याप कोणताही ...

Make a separate waiting room for the soldiers | जवानांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय करा

जवानांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय करा

Next

हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांच्याकडून स्वतंत्र प्रतिक्षालयासाठी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. देशासाठी बलिदान देणाºया जवानांना विमानतळावर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सुविधा मिळतात. त्यांना सन्मानाची वागणुक मिळायला हवी. त्यासाठी विमानतळावर स्वतंत्र प्रतिक्षालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी काही दिवसांपुर्वी बापट यांना पत्र दिल्याची माहिती वंडेकर यांनी दिली.

बापट यांनी या पत्राच्या आधारे विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांना सूचना केली आहे. विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे काम सध्या सुरू असून काही महिन्यांत हे काम पुर्ण होईल. जुन्या इमारतीमध्ये जागेची कमतरता असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. पण आता नवीन इमारतीत प्रतिक्षालयासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या सुचनेचा आदर करून जागेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी वंडेकर यांनी केली आहे.

--------

Web Title: Make a separate waiting room for the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.