शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल पन्नास रुपये लिटर करा; पुण्यातून संभाजी ब्रिगेडची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 18:25 IST

पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये दर कमी करणे म्हणजे लोकांची जखम कुरतडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे

पुणे : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडेल इतकी इंदर दरवाढ झाली. महाराष्ट्रासह भारतीय जनतेला लुटण्याचे काम मोदी सरकार करत आहे. गगणाला भिडणारी ही इंधन दरवाढ मोदी सरकारचे पाप आहे. पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये दर कमी करणे. म्हणजे लोकांची जखम कुरतडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल पन्नास रुपये लिटर करावे अशी मागणी पुण्यातून संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

ऐंशी रुपये पेट्रोल - डिझेल दरवाढ झाल्यावर बोलणाऱ्या स्मृती इराणी, हेमा मालिनी, राजनाथ सिंह सध्या कुठेच दिसत नाहीत. कारण यांना सत्तेची मस्ती आणि पदाची सुस्ती चढलेली आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमला हा देश लुटायचा आहे. सर्व शासकीय कंपन्या अदानी अंबानीला विकून या देशात बलाढ्य यंत्रणांच खाजगीकरण करायचं आहे. देशभक्तीचे गाजर दाखवून व 'अच्छे दिना'च्या काळ्या रांगोळ्या काढून हा देश रसातळाला गेला. हे संघी वास्तव आहे. थोडी तरी अर्थतज्ञांकडून अक्कल विकत घेऊन तात्काळ इंधन दरवाढ ५० टक्केच्या वर कमी केली पाहिजे. म्हणून पेट्रोल डिझेलचे दर ५० रुपये लिटर पर्यंत दर कमी केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे. 

महागाईने सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले 

देशात जीएसटी (GST) ची नवीन कर प्रणाली नरेंद्र मोदी सरकारने आणली. त्याला इंधन अपवाद ठेवले. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सर्व जीएसटीच्या कक्षा आणाव्यात अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सर्वसामान्य माणसाची दिवाळी 'कडू' करणाऱ्या केंद्र सरकारला तसेच गप्प बसणाऱ्या राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना सुद्धा शुभेच्छा देणार नाही. कारण महागाई ने सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.

 

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPetrolपेट्रोलDieselडिझेल