शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी भरण्यासाठी बनवा मोबाईल अ‍ॅप, पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 19:11 IST

देशात जीएसटी लागू होऊन १ जुलैला वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने जीएसटीमध्ये आणखी सुधारणा व्हाव्यात यासाठी ग्राहकपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायत : जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची पंतप्रधानांकडे केली मागणीजीएसटीसाठी अ‍ॅप तयार करण्याबरोबरच बँकिंग शुल्क माफ केल्यास आॅनलाईन व्यवहारांना चालना

पुणे : करदात्यांना वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) भरणा सुलभरीतीने करता यावा या साठी सरकारने मोबाईल अ‍ॅप तयार करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे असेही पत्रात म्हटले आहे. देशात जीएसटी लागू होऊन १ जुलैला वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने जीएसटीमध्ये आणखी सुधारणा व्हाव्यात यासाठी ग्राहकपंचायतीने पुढाकार घेतला आहे. आजमितीस अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांकडे संगणकाची सुविधा नाही. त्यामुळे जीएसटीचा भरणा करण्यासाठी सरकारने मोबाईल अ‍ॅप तयार करावे. त्यात खरेदी, विक्री, जीएसटी क्रमांक, पॅन आणि आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा द्यावी. तसेच संबंधित व्यक्तीचा ई-मेल क्रमांक नोंदवून त्यावर करभरणा केल्याची माहिती त्यावर पाठवावी.  बँकींग प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या करदाते कार्डद्वारे करभरणा करण्याऐवजी रोखीने करभरणा करणे पसंत करतात. कारण त्यावर करदात्यांना २ टक्के बँकींग शुल्क भरावे लागते. त्यामुळे क्रेडीट अथवा डेबिट कार्डच्या व्यवहारांवरील शुल्क माफ केले पाहीजे. जीएसटीसाठी अ‍ॅप तयार करण्याबरोबरच बँकिंग शुल्क माफ केल्यास आॅनलाईन व्यवहारांना चालना मिळेल. त्यामुळे नोटा छपाईचा खर्च भविष्यात कमी होईल. जीएसटी अ‍ॅपमुळे प्राप्तीकर विभागाला देखील करसंकलन करण्यासाठी फायदा होईल. विविध प्रकारची भाडे, वीज शुल्क, विविधप्रकारचा करभरणा देखील आॅनलाइन झाला आहे. त्यामुळे करदात्याला आपले उत्पन्न वेगळे घोषित करण्याची गरज उरणार नाही. बँकांचा देखील व्यवहार आॅनलाइन होणार असल्याने त्यांचा व्यवस्थापनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल. सर्वांच्याच दृष्टीने हा बदल फायदेशीर ठरणार आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे बदल करावेत, अशी विनंती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेGSTजीएसटीGovernmentसरकारbankबँक