शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

विधानसभेचे बहुसंख्य इच्छुक गणपती बाप्पांच्या चरणी लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:32 IST

सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तसे वारंवार सांगितलेही जात आहे.

ठळक मुद्देदहिहंडीही गाजवली : आचारसंहितेआधीच्या उत्सवांचा फायदा

पुणे : विधानसभेचे बहुसंख्य इच्छुक गणरायाच्या चरणी लीन झाले आहेत. त्याआधी दहिहंडीचा उत्सवही बहुतेकांनी गाजवला. निवडणूक आचारसंहितेआधी आलेल्या उत्सवांचा फायदा घेत मतदारांसमोर चर्चेत राहण्याची संधी इच्छुकांकडून साधली जात आहे.त्यात आजीमाजी नगरसेवकांबरोबच मंडळाच्या माध्यमातून बरीच वर्षे परिसरात सामाजिक कार्य करणाऱ्यांचाही समावेश आहे.सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तसे वारंवार सांगितलेही जात आहे. एकदा आचारसंहिता जारी झाली की इच्छुकांच्या मिरवण्यावर बंधने येणार आहेत. त्यामुळे त्याआधी येणाऱ्या सगळ्या सण व उत्सवांमध्ये मिरवण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे. नेते तयार करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सव प्रसिद्ध आहेच. त्यामुळे बहुसंख्य इच्छुक कोणत्या ना कोणत्या तरी मंडळाबरोबर संबधित आहेतच. मंडळ नसले तर मग पुण्यनगरीत आलेल्या गणेश भक्तांचे स्वागत असे लिहिलेले मोठमोठे फ्लेक्स आपल्या कार्यक्षेत्रात लावून मतदारांसमोर सतत राहण्याचा प्रयत्न केला जात आहे.  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ कोथरूड मधून विधानसभेसाठी इच्छुक आहे. या भागातील साई मित्र मंडळाचे ते संस्थापक आहेत. मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेची रेलचेलच उडवून दिली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा देखावा त्यांनी साकारला असून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्याचे अनावरणही केले. भाजपाच्या अन्य काही नगरसेवकही आपापल्या मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्धीची हौस भागवून घेत आहेत. धीरज घाटे हेही भाजपाचे नगरसेवक आहेत. त्यांनाही कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. अयोध्येतील नियोजित राम मंदिराचा भला मोठा देखावा त्यांनी साने गुरूजी मित्र मंडळात सादर केला आहे. त्यांनीही फ्लेक्स लावून मतदारांसमोर आपला चेहरा कायम राहील याची काळजी घेतली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्र्यांच्या छायाचित्रांची एक मोठी पट्टी व त्याखाली इच्छुकाचे भले मोठे छायाचित्र असे फ्लेक्स भाजपाच्या बहुसंख्य इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघातील मोक्याच्या ठिकाणी लावले आहेत.विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक कसबा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनी दहिंहडीनिमित्त या मतदारसंघातील शिवसेनेच्या अनेक सार्वजनिक मंडळांना मदत करून सगळीकडे आपले फ्लेक्स झळकवले. आता गणेशोत्सवातही त्यांनी कसबा मतदारसंघात अनेक ठिकाणी भाविकांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. शिवसेनेच्या अन्य काही नगरसेवकांनीही गणेशोत्सवाचे निमित्त साधत आपालल्या मतदारसंघात फ्लेक्सचा पूर आणला आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आदित्य ठाकरेपर्यंत सर्वांची छायाचित्र व मध्यभागी स्वत:चे एक मोठे चित्र अशी या फलकांची रचना आहे.सुनिल टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांना वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहनाचा सोशल मिडियावरून धडाका लावला आहे. हौदात विसर्जन करणे कसे योग्य, पर्यावरणाचे रक्षण किती गरजेचे आहे असा संदेश देणारे व्हाटस अप फलक ते परिचितांमधील सर्वांना पाठवत आहेत. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना