शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 05:03 IST

पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे.

पुणे : पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे़ नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अपर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तसेच, पुणे शहरातील चारही परिमंडळांतील पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आल्याने आगामी काळात येणाऱ्या दहीहंडी, गणेशोत्सवात शहर पोलिसांची कसोटी लागणार आहे़नक्षलग्रस्त भागात काम केलेले रवींद्र कदम यांची पुन्हा नागपूर शहरात सहपोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नागपूरचे सहआयुक्त शिवाजीराव बोडसे यांची नियुक्ती केली आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची बढतीवर मुंबईत पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती केली आहे़ विशेष शाखेचे उपायुक्त संजय बाविस्कर यांची बढतीवर अमरावती पोलीस आयुक्त म्हणून बदलीकेली आहे़ तसेच, बी. जी. गायकर यांची बढतीवर नागपूर शहरात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)पदी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १ चे समादेशक सुनील फुलारी यांची बढतीवर पुण्यात अपर पोलीस आयुक्त उत्तर विभागात नियुक्ती केली आहे.पुढील २ महिन्यांत महत्त्वाच्या असलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सव या सणांमध्ये शहरातील परिमंडळ १ आणि २ च्या पोलीस उपायुक्तांची महत्त्वाची भूमिका असते.  परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांचील पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे आणि परिमंडळ २ चे डॉ. प्रवीण मुंडे यांची धुळे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.पिंपरी-चिंचवडसाठी परिमंडळ ३चे उपायुक्त गणेश शिंदे यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी आणि परिमंडळ ४चे उपायुक्त दीपक साकोरे यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे़ एकाच वेळी चारही परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांची बदली होण्याची ही पहिलीच वेळ आहे़गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे (पोलीस अधीक्षक, सीआयडी, नवी मुंबई), डी़ एस़ कुलकर्णी प्रकरणात महत्त्वाची भूमिका असणारे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे़पुणे शहर सहआयुक्तपदी शिवाजीराव बोडखेपुणे शहरात सह आयुक्तपदी नागपूरचे शिवाजीराव बोडखे यांनी नियुक्ती झाली आहे़ बोडखे हे मूळचे श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रीकचे राहणार असून त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली आहे़ १९८४मध्ये त्यांचीपोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ २०१७ पासून ते नागपूरमध्ये सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते़ नक्षलविरोधी अभियान राबविण्यात त्यांना चांगले यश आले़ गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीच्या पोलीस पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे़पुणे शहरात आलेल्या पोलीस उपायुक्तांमध्ये बच्चन सिंग (अप्पर अधीक्षक, जळगाव), मंगेश शिंदे (अप्पर अधीक्षक, नांदेड), प्रकाश संपतराव गायकवाड (अप्पर अधीक्षक, सिंधुदुर्ग), स्मार्तना एस. पाटील (उपायुक्त, नागपूर शहर), सुहास पी. बावचे (नागपूर शहर), प्रसाद अक्कानवरू (सीआयडी ), शिरीष सरदेशपांडे (सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई ), तेजस्वी सातपुते (अप्पर अधीक्षक, पुणे ग्रामीण ते उपायुक्त) यांचा समावेश आहे़पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अपर पोलीस आयुक्त म्हणून पुणे व पिंपरीची माहिती असणारे आणि अनेक वर्षे येथे काम केल्याचा अनुभव असलेले मकरंद रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तसेच उपायुक्त म्हणून नम्रता पाटील, विनायक ढाकणे यांची नियुक्ती केली गेली आहे़ त्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यरत करण्याच्या दृष्टीने घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सातारा येथील अधीक्षक संदीप पाटील यांची, तर अपर अधीक्षकपदी मुंबईतील राज्य गुप्तवार्ताचे उपायुक्त संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ़ सुरेशकुमार मेकला यांची नवी मुंबईचे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे़पुणे शहरात उपायुक्त म्हणून काम केलेले अरविंद चावरिया यांची हिंगोली अधीक्षकपदावरून राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्ऱ १ चे समादेशक म्हणून, तर धुळे येथील अधीक्षक एम़ रामकुमार यांची गट क्ऱ २ चे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे़अमरावती शहराचे पोलीस आयुक्त डी़ वाय. मंडलिक यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे़नागपूर शहर पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांची पुण्यात दहशतवाद विरोधी पथकात पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलीस दलातील इतक्या वरिष्ठ अधिकाºयांची एकाच दिवशी बदली होण्याची ही पहिलीच वेळ आहे.बढतीसाठी राज्यातील काही उपायुक्तांनी मॅटमध्ये धाव घेतली होती़ मॅटने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सार्वत्रिक बदल्यांमध्ये त्यांना बढती देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ त्यानुसार पुणे शहरात संजय बाविस्कर, बी़ जी़ गायकर, राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्ऱ १ चे समादेशक सुनील फुलारी, ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांच्यासह १२ अधिकाºयांना बढती देण्यात आली आहे़पुण्यातील चारही परिमंडळांच्या उपायुक्तांची बदली होण्याची ही पहिलीच वेळ.पुण्यात नियुक्तीशिवाजीराव बोडखे, सुनील फुलारी, बच्चन सिंग, प्रसाद अक्कानवरू, शिरीष सरदेशपांडे, तेजस्वी सातपुते, प्रकाश गायकवाड, स्मार्तना पाटील, सुहास बावचे, मंगेश शिंदे; पिंपरी-चिंचवडसाठी मकरंद रानडे, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, ग्रामीण अधीक्षकपदी संदीप पाटील व संदीप जाधव अपर अधीक्षकपदी.पुण्यातून बदलीरवींद्र कदम, संजय बाविस्कर, बी़ जी़ गायकर, सुवेझ हक, दीपक साकोरे, गणेश शिंदे, पकंज डहाणे, सुधीर हिरेमठ, डॉ़ प्रवीण मुंडे व डॉ़ बसवराज तेली.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे